Tuesday, May 14, 2024
Homeजळगावसव्वालाख विद्यार्थ्यांना गणवेश

सव्वालाख विद्यार्थ्यांना गणवेश

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

समग्र शिक्षा अभियानांतर्गत (Holistic education campaigns) 1 लाख 54 हजार 744 मुला-मुलींच्या मोफत गणवेशासाठी (Free uniforms) शासनाकडून (Government) 9 कोटी 28 लाख 46 हजार 400 रुपयांचा निधी (funds) मे महिन्यातच मंजूर झालेला आहे. मात्र, पीएफएमएस प्रणाली अडथळ्यामुळे बँकांकडून निधी वितरणाला विलंब झाल्याने पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे आश्वासन हवेतच विरले आहे. आतापर्यंत 1 लाख 5 हजार 290 विद्यार्थ्यांना गणवेश वाटप (Distribution of Uniforms) करण्यात आला आहे. तर उर्वरित 49 हजार 454 विद्यार्थ्यांच्या गणवेश शिवण्याची प्रक्रिया ट्रेलरकडे सुरु असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली.

- Advertisement -

जिल्ह्यात 1 हजार 860 शाळा असून समग्र शिक्षा अभियानांतर्गंत नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदेच्या शाळेतील सर्व पहिली ते आठवीच्या मुली, आदिवासी मुले, मुली, मागासवर्गीय मुले, मुली तसेच दारिद्रय रेषेखालील मुले या योजनेसाठी पात्र ठरले असून प्रत्येकी दोन गणवेश देण्यासाठी 9 कोटी 28 लाख 46 हजार 400 रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला होता. त्यादृष्टीने जूनमध्येच शाळा उघडण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात आले होते.

मात्र, शासनाने यंदा पीएफएमएस प्रणाली (पब्लिक फायन्स् मॅनेमेंट सिस्टम) ही अंमलात आणली असून तिचे पहिलेच वर्ष असून पीएफएमएस प्रणालीद्वारे शासनाने निधी देण्याचे ठरविले आहे. हा निधी बँकांमार्फत शाळा समितीच्या खात्यावर वर्ग होण्यास उशिर लागल्याने विद्यार्थ्यांना गणवेश देण्याच्या प्रक्रियेला विलंब झाला आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात 1 लाख 54 हजार 744 मुला-मुलींपैकी 1 लाख 5 हजार 290 विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यात 70 टक्के विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला असून आता उर्वरित 30 टक्के विद्यार्थ्यांचे गणवेश शिवण्याची प्रक्रिया ट्रेलरकडे सुरु आहे.

येत्या 8 ते दहा दिवसात शंभर टक्के विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाची प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी दिली.

नवापुरात चड्डी बनियन गँग सक्रिय

असे आहेत पात्र विद्यार्थी

जिल्ह्यात 945 मुली, 8605 अनुसूचित जातीची मुले 32 हजार 031 अनुसूचित जमातीची मुले आणि 19 हजार 572 दारिद्रय रेषेखालील पालकांची मुले अशा एकूण 1 लाख 54 हजार 744 विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्यासाठी प्रति विद्यार्थी 600रु.याप्रमाणे 9 कोटी 28 लाख 46 हजार 400 रुपयांची तरतूद केली आहे.

सप्ताह घडामोडी : भल्या माणसा जागा हो, लसीकरणाचा धागा हो !

विद्यार्थ्यांना 600 रुपयात दोन गणवेश

समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत गणवेशासाठी पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी सहाशे रुपयांचा निधी दिला असून या 600 रुपयात दोन गणवेश शिवूण विद्यार्थ्यांना देण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे दिली आहे. जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासनाच्या नियमित पाठपुराव्यामुळे 70 टक्के गणवेश विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले आहे.

सीईओ डॉ.पंकज आशिया यांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार गणवेश देण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार गुणवत्तापूर्ण कापडाचा गणवेश विद्यार्थ्यांपर्यंत कसा पोहोचेल, यासाठी गटशिक्षणाधिकार्‍यांसह मुख्याध्यापकांना सूचना दिल्या असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या