Thursday, April 25, 2024
Homeनगरशेतात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

शेतात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

बेलपिंपळगाव | वार्ताहर

उसाच्या शेतामध्ये अनोळखी महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव-बहिरवाडी शिव रस्त्यावरील शेतामध्ये अनोळखी महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली.

तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाची आत्महत्या

नेवासा बुद्रुक शिवारात सुरेश गारूळे यांच्या शेतातील ऊसाची तोड चालू असताना आज (शनिवार) रोजी ऊस तोड मजुरांना कुजलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर मजुरांनी ती माहिती शेती मालक गारुळे यांना माहिती दिली.

बेलपांढरीचे सरपंच साहेबराव गारुळे यांना सांगितले असता त्यांनी घटनेची माहिती नेवासा पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक विजय करे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे.

अपहरण झालेल्या ‘त्या’ व्यापाऱ्याचा मृतदेह आढळला

- Advertisment -

ताज्या बातम्या