Friday, April 26, 2024
Homeनगरउंदिरगाव सोसायटीची निवडणूक बिनविरोध

उंदिरगाव सोसायटीची निवडणूक बिनविरोध

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्याच्या राजकारणाच्यादृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या उंदिरगाव विविध कार्यकारी सहकारी संस्थेची संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडून सदरची संस्था अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आ. भानुदास मुरकुटे व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक करण ससाणे गटाच्या ताब्यात आली आहे.

- Advertisement -

उंदिरगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या संचालक मंडळाच्या 13 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यात स्थानिक पातळीवर मुरकुटे व ससाणे गटामध्ये युती होऊन मुरकुटे गटाला 9 तर ससाणे गटाला 4 जागा असा समझोता होऊन निवडणूक बिनविरोध संपन्न झाली.

बिनविरोध निवडून आलेले उमेदवार असे : सर्वसाधारण कर्जदार प्रतिनिधी भाऊसाहेब परसराम बांद्रे, बाबासाहेब आप्पासाहेब नाईक, प्रमोद मोहनीराज भालदंड, महेश पंढरीनाथ गायके, संदीप भगवान ताके, विजय बबन गिर्‍हे (मुरकुटे गट), अमोल अशोक नाईक, गोकुळ सावळेराम भालदंड (ससाणे गट), महिला प्रतिनिधी मंगल ज्ञानदेव भालदंड (मुरकुटे गट), कांताबाई भाऊसाहेब गुळवे (ससाणे गट), अनु. जाती जमाती प्रतिनिधी छगन बाबुराव आव्हाड (ससाणे गट), इतर मागासवर्ग प्रतिनिधी सुधीर नानासाहेब ताके (मुरकुटे गट), भटक्या विमुक्त जाती जमाती प्रतिनिधी शांताराम रामदास गायकवड (मुरकुटे गट).

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. रुद्राक्षे व योगेश सरोदे यांनी काम पाहिले. या सर्व उमेदवारांचे माजी आ. भानुदास मुरकुटे, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, शिर्डी संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, अशोक कारखान्याचे व्हा.चेअरमन भाऊसाहेब उंडे, अशोक बँकेचे व्हा. चेअरमन अ‍ॅड.सुभाष चौधरी, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ, मुळा प्रवरा वीज संस्थेचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे, अशोक कारखान्याच्या संचालिका मंजुश्री मुरकुटे आदींनी अभिनंदन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या