Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याअंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीच्या भावाचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीच्या भावाचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

मुंबई | Mumbai

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गटामध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे. अशातच अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीचा भाऊ प्रदीप गवळी आणि माजी नगरसेविका वंदना गवळी या दोघांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मुख्यमंत्र्यांची ताकद वाढली अशी चर्चा सुरू आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी दगडी चाळीतील शेकडो कार्यकर्ते यांनी शिंदे गटात प्रवेश केला. प्रदिप गवळी, माजी नगरसेविका वंदना प्रदीप गवळी यांच्यासहीत अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी, अनेक विद्यार्थ्यी जखमी

मुंबईतील भायखळा परिसरातील माजी नगरसेविका वंदना गवळी आणि प्रदीप गवळी यांच्यासह अखिल भारतीय सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला असं ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

पिस्तुलातून गोळ्या घालून प्राध्यापकाची हत्या

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, हे सरकार सर्वसामान्य लोकांचे सरकार असून या राज्याला पुढे घेऊन जाणार सरकार आहे, या राज्याचा सर्वांगीण विकास करणारे सरकार आहे. तुमचा विश्वास सार्थ ठरवण्याचे काम आपले कार्यकर्ते करतील, याची मी तुम्हाला खात्री देतो, असे त्यांनी म्हंटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या