Wednesday, April 24, 2024
Homeनगरकिचनमध्ये अस्वच्छता; नगरमधील हॉटेलचा परवाना निलंबित

किचनमध्ये अस्वच्छता; नगरमधील हॉटेलचा परवाना निलंबित

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

हॉटेलच्या किचनमध्ये अस्वच्छता, झुरळांचा वावर, फ्रिजमधील अस्वच्छता, कच्चे अन्नपदार्थ मुदतबाह्य झालेले मसाले

- Advertisement -

आढळल्याने नगर शहरातील हॉटेल औरसचा परवाना सात दिवसांसाठी निलंबित करण्यात आला असल्याची माहिती अन्न प्रशासनाचे सहायक आयुक्त संजय शिंदे यांनी दिली. 26 एप्रिल ते 2 मे 2021 या काळात संबंधितांना हॉटेल बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

अन्न प्रशासनाने 30 डिसेंबर रोजी नगर शहरातील मनमाड रोडवरील हॉटेल औरसची तपासणी केली होती. या हॉटेलमध्ये तपासणीवेळी अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. प्रामुख्याने किचनमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळली. त्यामुळे व्यवस्थापनाला 6 जानेवारी 2021 रोजी सुधारण्याची नोटीस देण्यात आली.

नोटिशीच्या मुदतीत हॉटेलकडून कोणताही खुलासा आला नाही. त्यामुळे 1 फेब्रुवारीला पुन्हा तपासणी करण्यात आली. तेव्हा पूर्वी आढळून आलेल्या 34 मुद्द्यांपैकी केवळ सहा मुद्द्यांची पूर्तता करण्यात आल्याचे आढळून आले. त्यावर सुनावणी ठेवण्यात आली. त्यासाठी 25 फेब्रुवारीला तारीख देण्यात आळी.

मात्र त्यावेळीही हॉटेल व्यवस्थापनाकडून समाधानकार खुलासा सादर करण्यात आला नाही. त्यामुळे हॉटेलचा परवाना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 26 एप्रिल ते 2 मे या सात दिवसांसाठी परवाना निलंबित करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या