Saturday, April 27, 2024
Homeजळगावपावसाची अनिश्चितता, हवामान बदलाने सजीवांसह शेतीही संकटात

पावसाची अनिश्चितता, हवामान बदलाने सजीवांसह शेतीही संकटात

जळगाव jalgaon प्रतिनिधी

पावसाची अनिश्चितता  (Uncertainty of rainfall) अतिवृष्टी, दुष्काळ, चक्रीवादळ, तापमानवाढ (warming) ही हवामान बदलाची चिन्हे (Signs of climate change) आहेत. या बदलामुळे पृथ्वीवरील (earth) सर्वच सजीवांना धोका (Threat to living beings) निर्माण होत आहे. तसेच शेती (agriculture) देखील मोठ्या प्रमाणावर संकटात आहे. ही बाब अतिशय चिंतेची (crisis)आहे. त्यामुळे हवामान बदलाबाबत जनजागृती (public awareness) करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन पुणे येथील पर्यावरण शिक्षण केंद्राचे (Environmental Education Center at Pune) कार्यक्रम संचालक सतिश आवटे (Program Director Satish Awte) यांनी व्यक्त केले.        

- Advertisement -

   कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभाग आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘हवामान बदल’ या विषयावरील राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

वेबिनारचे उद्घाटन विद्यापीठाचे प्र- कुलगुरु प्रा.डॉ.एस.टी.इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला व मानव्यविद्या प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ. अनिल चिकाटे, युनिसेफच्या माध्यम सल्लागार श्रुती गणपत्ये, विभागप्रमुख प्रा.डॉ. सुधीर भटकर, डॉ.विनोद निताळे, डॉ.गोपी सोरडे, डॉ.सोमनाथ वडनेरे उपस्थित होते.  

          पुढे बोलताना सतिश आवटे म्हणाले की, हवामान बदलामुळे केवळ मानवी आरोग्यावरच नव्हेतर अन्न सुरक्षा, वन्यजीव, पशु-पक्षी, जैवविविधता अशा सर्वच क्षेत्रात विपरित परिणाम होताना दिसून येत आहे. मालद्विप सारखी बेटे आणि अॅमेझान सारखे जंगले नष्ट होण्याच्या धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हवामान बदल ही जागतिक समस्या असून त्यावर उपाय योजना केल्यास संभाव्य धोके टळू शकतात.

हवामान बदल हा कोणत्याही एका घटकामुळे घडून येत नसून ती एक साखळी आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. हवामान आणि पर्जन्यमानात होणाज्या बदलांचा शेतातील उत्पादन क्षमतेवर कायमस्वरूपी परिणाम होवू शकतो. त्यामुळे गहू, तांदूळ, मका, ज्वारी आणि केळीच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली.   

         उद्घाटन प्रसंगी बोलताना प्र-कुलगुरु प्रा.डॉ.एस.टी.इंगळे म्हणाले की, पर्यावरणाचे संतुलन राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा विपरित परिणाम सजीव सृष्टीवर होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या सवंर्धनासाठी जनजागृती मोठ्या प्रमाणावर होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. कला व मानव्यविद्या प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ. अनिल चिकाटे यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त केले.  

विभागप्रमुख प्रा.डॉ. सुधीर भटकर यांनी आयोजनासंदर्भातील भूमिका विशद केली. परिचय युनिसेफच्या माध्यम सल्लागार श्रुती गणपत्ये यांनी करून दिला.  सूत्रसंचालन डॉ.गोपी सोरडे यांनी केले. आभार डॉ.सोमनाथ वडनेरे यांनी मानले.  

- Advertisment -

ताज्या बातम्या