Thursday, April 25, 2024
Homeनगरअनधिकृत नळ कनेक्शनवर कारवाई

अनधिकृत नळ कनेक्शनवर कारवाई

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

सुपा औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणार्‍या जलवाहिनीतून अनधिकृतपणे घेतलेले नळ कनेक्शन बुधवारी (दि.27 एप्रिल) एमआयडीसी कर्मचार्‍यांनी तोडले. एमआयडीसीचे सहायक अभियंता कराळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

सुपा औद्योगिक वसाहतीच्या जलवाहिन्यांतून अनधिकृतपणे मुख्य जलवाहिनीला होल पाडून मोठ्या प्रमाणात पाणी चोरले जात आहे. या पाण्याचा काही नागरिक व्यावसायिक उपयोग करताना आढळून आले. मोठ्या प्रमाणात पाणी चोरी होत असल्याने पुढे औद्योगिक वसाहतीत कंपन्यांना कमी प्रमाणात पाणीपुरवठा होतो. याबाबत संबंधितांना वेळोवेळी सूचना देऊनही पाणी चोरी थांबत नसल्याने बुधवारी औद्योगिक वसाहतीचे वीस ते पंचवीस कर्मचारी सर्व फौज फाट्यासह सुप्यात दाखल झाले व अनधिकृत जोडलेले नळ कनेक्शन तोडले. यावेळी तोडलेल्या कनेक्शनच्या पाईपांनी ट्रॅक्टरची ट्रॉली भरली होती.

दरम्यान, कडक उन्हाळा असल्याने नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई थांबवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. यावर रितसर अर्ज केल्यानंतर नळ कनेक्शन मिळेल, असे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या