श्रीगोंद्यात तुकडेबंदिला केराची टोपली

jalgaon-digital
2 Min Read

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी|Shrigonda

श्रीगोंदा शहरासह तालुक्यातील मोक्याच्या शेतजमिनीचे अनधिकृत पणे गुंठेवारीचे प्रकार श्रीगोंदा तालुक्यात सर्रास सुरू आहेत. तुकडेबंदी कायद्याला केराची टोपली दाखवत शासनाची फसवणुक होत आहे. तसेच अनेकांना स्वस्तात गुंठे दोन गुंठे विक्रीसाठी आमिष दाखवत फसवण्याचे प्रकार सुरू आहेत.

दुय्यम निबंधकानी खरेदी दस्त नोंदवल्या पासून गुंठेवारी ची एकत्रित तुकडे गटात विभागणी होत असताना अश्या नोंदी सातबारावर तलाठी आणि मंडलाधिकारी मंजूर करत आहेत. तुकडेबंदी आदेश पायदळी तुडवर सामुहिक गुंठे खरेदी दाखवली जात असल्याचा प्रकार सुरू आहे. जमिनीचे वाढते बाजार पाहता अनेकांना घरासाठी जागा मिळण्याची धडपड करावी लागते.घरासाठी जमीन घेण्याचे स्वप्न साकार होण्यासाठी पाच सात लाख रुपये गुंठा इतका भाव द्यावा लागत असतानाच. श्रीगोंदा शहरात गरजूंना स्वस्तात जमिनीचे गाजर दाखवत शेती क्षेत्र असलेल्या जमिनी बेकायदेशीर रित्या प्रशासनाला हाताला धरून गुंठेवारी करून विक्री केली जात असल्याने तुकडेबंदी आदेशाचा भंग होत आहे.

शेती झोन मधील जमिनी रहिवासी झोन म्हणून विक्री होत आहेत. यात रहिवासी जमीन करण्यासाठी महसूल विभागाकडून जमीन येणे करणे गरजेचे असताना शहरातील अनेक शेत जमीनीचे सध्या गुंठेवारी सुरू असून पालिका ,नगररचना,महसूल विभागाकडून परवानगी न घेताच गुंठेवारी करून शेत जमिनी विक्री होत आहे. बिगरशेती करण्याचा खर्च नसल्याने अनेक गुंतवणूकदार या स्वस्तात मिळणार्‍या गुंठेवारी त पैसे गुंतवत आहेत. मात्र विकास आराखडा करण्यापूर्वी अश्या शेत जामीन चे तुकडे पाडले जात असल्याने तुकडेबंदी आदेशाचा भंग तर होतच आहे.याबरोबर एकाच शेतकर्‍यांच्या मालकीची असणारी शेत जमीन तुकडे पाडून विक्री केले असल्याने या शेत जमिनीचे मालक वाढत आहेत. शेती क्षेत्रात असे जमिनीचे तुकडेबंदी आदेशाचा भंग करत सुरू असलेल्या या व्यवहारात महसूल विभागाला हाताशी धरून हे प्रकार सुरू असताना प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते हे महत्वाचे असणार आहे.

एजंट मालामाल

अनधिकृत पणे शहरात तसेच तालुक्यातील महत्त्वाचे गावात रस्त्याच्याकडेला असणार्‍या शेत जामीनीचे बिगरशेती करण्याच्या फंदात न पडता तुकडे बंदी आदेशाचा अवमान करत विक्रीकरून देणारे एजंट जमीन मालकाला एकत्रित एकराचे पैसे देतात मात्र पुढे गुंठेवारी ने जमीन तुकडे पाडून विक्री करताना लाखो रुपये कमवात आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *