Friday, April 26, 2024
Homeधुळेदेवपूर पोलिस ठाण्यात जप्त 76 बेवारस वाहनांचा होणार लिलाव

देवपूर पोलिस ठाण्यात जप्त 76 बेवारस वाहनांचा होणार लिलाव

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

शहरातील देवपूर पोलिस ठाण्यात जप्त एकुण 76 बेवारस वाहने दि.15 जुन रोजी जाहिर लिलाव करून विक्री करण्यात येणार आहे.

- Advertisement -

तत्पुर्वी कोणाचे वाहन चोरी गेले असल्यास त्यांनी दि.13 जुन रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत वाहनांच्या कागदपत्राच्या पुराव्यासह देवपुर पोलीस ठाण्यात येवून आपले वाहन त्यात आहे का? याबाबत ओळख पटवुन आपले वाहन घेवुन जावे. त्यानंतर तक्रारींचा विचार केला जाणार नाही, असे आवाहन देवपूर पोलिस ठाण्याचे सपोनि चंद्रकांत पाटील प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

बेवारस वाहने घेऊ इच्छिणारे व्यक्तींनी दि 15 जुन रोजी सकाळी 9 वाजता लिलावात सहभागी होण्याकरीता वीस हजार रूपये डिपॉझिट रक्कम ही देवपुर पोलीस ठाण्यात जमा करावी लागेल. तसेच सर्व बेवारस वाहनांची यादी पोलीस ठाण्याच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आली आहे.

तरी ईच्छुक खरेदीदारांनी दि.15 रोजी सकाळी 9 वाजता देवपुर पोलीस ठाणे येथे लिलावात बोली लावुन सदर वाहने खरेदी करण्यासाठी उपस्थित रहावे. डिपॉझिट रक्कम जमा केल्याशिवाय तसेच भंगार/स्क्रॅपचे परवाना असल्याशिवाय लिलावात भाग घेता येणार नाही.

बोली लावुन वाहनांची पुर्ण रक्कम जमा करावी. त्यानंतरच वाहने ताब्यात दिले जातील. बोली लावुन वाहनांची पुर्ण रक्कम न भरल्यास डिपॉझिट रक्कम सरकार जमा करण्यात येईल. ती रक्कम संबधितास परत मागता येणार नाही, असेही प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या