Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकउमराणे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक बिनविरोध

उमराणे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक बिनविरोध

उमराणे | वार्ताहर Umrane

येथील स्व निवृत्तीकाका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Nivruttikaka APMC Umrane) अध्यक्षपदी प्रशांत देवरे व उपाध्यक्षपदी मिलिंद शेवाळे यांची बिनविरोध निवड झाली. येथील बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक १५ जानेवारी रोजी होती….(umrane apmc election done without opposed)

- Advertisement -

त्यावेळी पारंपरिक विरोधक असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत देवरे व माजी सभापती विलास देवरे यांनी अर्ज दाखल केले होते. ४ जानेवारीला माघारीची तारीख होती. यावेळी दोन दिवस अगोदरच राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे (maharashtra state agriculture minister dadaji bhuse) व आ डॉ राहुल आहेर (Bjp mla dr rahul aher) यांनी निवडणूक बिनविरोध करावी असे आवाहन केले होते.

त्यामुळे सर्व १८ जागाची निवडणूक बिनविरोध झाली होती. आज निवडणूक निर्णय अधिकारी सुजय पोटे (Election officer Sujay Pote) यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक कार्यक्रम पार पडला. दोन्हीही जागेसाठी एक एक अर्ज दाखल झाल्याने प्रशांत देवरे यांची अध्यक्षपदी व मिलिंद शेवाळे यांची उपाध्यक्षपदी यांची बिनविरोध निवड झाली. निवड जाहीर होताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

याप्रसंगी माजी सभापती विलास देवरे, राजेंद्र देवरे, संचालक माजी सरपंच देवानंद वाघ, प्रा सतीश ठाकरे, कांदा व्यापारी सुनील देवरे, प्रवीण देवरे, प्रवीण आहिरे, दादाजी खैरनार, यशवंत ठाकरे, दिपक निकम, सुमनबाई पवार, अनिता बस्ते, वैशाली आहेर, बेबीबाई खैरनार, अंजली केदारे, शेतकरी संघाचे अध्यक्ष संदीप देवरे, माजी सरपंच दिलीप देवरे, डॉ रामदास देवरे, काशिनाथ देवरे, भाऊसाहेब देवरे, शिवाजी देवरे, भिला देवरे, प्रमोद देवरे, किशोर जाधव, सचिव नितीन जाधव, उपसचिव तुषार गायकवाड कांदा व भुसार व्यापारी हमाल मापारी शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.

निवडीनंतर श्रीरामेश्वर भगवान मंदिरात श्रीफळ चढविण्यात आले व छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. ग्रामस्थांच्या वतीने नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सत्कार संपन्न झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या