Friday, April 26, 2024
Homeनगरउमेद अभियानातील कर्मचार्‍यांचा मूकमोर्चा

उमेद अभियानातील कर्मचार्‍यांचा मूकमोर्चा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महिलांच्या विकासासाठी असलेल्या उमेद अभियानातील कर्मचारी व अधिकारी यांना सेवाबाह्य संस्थांकडे

- Advertisement -

वर्ग न करता पूर्ववत कायम ठेवण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे उमेद अभियानातील कर्मचार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. या मोर्चात आजिनाथ आव्हाड, प्रवीण गायकवाड, प्रमोद पांडे, बाबा सरोदे, मंजुषा धीवर, ज्ञानेश्वर गव्हाणे, रवींद्र खलाटे, राहुल साळवे आदींसह कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राज्यात 2011 पासून सुरू आहे. या अभियानाअंतर्गत महिलांच्या संस्था उभ्या करणे व महिलांची क्षमता बांधणी करणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करून आर्थिक समावेश करणे व शाश्वत उपजीविका निर्माण करणे हे चार प्रमुख कार्य पार पाडले जाते. या कामाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी अभियानाने मनुष्यबळ संसाधन मार्गदर्शक तत्वानुसार राज्य, जिल्हा, तालुका प्रभाग ग्रामस्तरावर अभियान कक्षाची स्थापना व संरचना केली आहे.

सात वर्षांपासून त्या प्रशिक्षित करून त्यांना पारंगत करण्यात आलेले आहे. त्यामुळे राज्यात 4 लाख 78 हजार 204 बचत गट तयार झाले असून त्यात राज्यातील एकूण 49 लाख 34 हजार 601 कुटुंबातील महिला सहभागी झाल्या आहेत. याच गटाचे ग्रामसंघ तयार करण्यात आले आहेत. तर प्रभाग स्तरावर एकूण 801 प्रभाग संघ तयार झालेले आहेत.

नुकतेच राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे मुख्य कार्यकारी अधिकारी (मुंबई) यांचे पत्र प्राप्त झाले. त्यानुसार राज्य कर्मचार्‍यांचा करार संपल्यामुळे पूर्ण नियुक्ती घ्यायची होती. ते करार थांबवण्यात आले आहे. या विरोधात आंदोलन करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या