Saturday, April 27, 2024
Homeनगरउंबरे सोसायटीत 12 जागेसाठी 24 उमेदवार

उंबरे सोसायटीत 12 जागेसाठी 24 उमेदवार

उंबरे |वार्ताहर| Umbare

राहुरी तालुक्यातील उंबरे सोसायटीची निवडणूक बारा जागेसाठी होणार असून 24 उमेदवार या निवडणुकीत उभे आहेत. तर एक जागा बिनविरोध निवड झाली आहे. दि.15 एप्रिल रोजी निवडणूक होणार असून यासाठी 1 हजार 550 मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. गावपातळीवर आपापल्या सोयीनुसार युती करून ही निवडणूक लढविली जात आहे. यामध्ये तालुका पातळीवरील कुठल्याही राजकीय पुढार्‍यांचा आशिर्वाद घेतला जात नाही व राजकीय पुढारी आशिर्वाद देत नाही. कारण दोन्ही गटात आपलेच कार्यकर्ते निवडणूक लढवत असल्यामुळे राजकीय पुढार्‍यांना सगळ्यांबरोबर हितसंबंध जपायचे असतात. म्हणून तालुकास्तरावरून गावपातळीच्या निवडणुकीत लक्ष दिले जात नसल्यामुळे या निवडणुका अतिशय अटीतटीच्या होत आहेत.

- Advertisement -

या निवडणुकीमध्ये डॉ. तनपुरे कारखान्याचे चेअरमनसह माजी संचालकांनी एकमेकांच्या विरोधात पॅनल उभे केल्यामुळे या निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाली आहे. दोन पॅनलमध्ये सरळ-सरळ लढत होऊन वि. जा. भ. ज. या जागे साठी आदिनाथ सेवा मंडळाचे भाऊसाहेब बाचकर यांचा एकमेव अर्ज असल्याने ते बिनविरोध निवडून आले आहेत. आदिनाथ सेवा मंडळाचे नेतृत्व डॉ. तनपुरे कारखान्याचे चेअरमन नामदेवराव ढोकणे, माजी संचालक सुनील अडसुरे, शिवसेना तालुकाप्रमुख विजयराव ढोकणे, गोरख ढोकणे, भाऊराव ढोकणे, किसनराव पटारे, भास्कर ढोकणे आदी करीत आहेत.

या मंडळाचे पुढीलप्रमाणे उमेदवार, शिवाजी अडसुरे, भाऊसाहेब तांबे, नानाभाऊ ढोकणे, सोपान दुशिंग, लक्ष्मण तोडमल, एकनाथ ढोकणे, दत्तात्रय ढोकणे, शिवाजी ढोकणे, संदीप ढोकणे, अशोक पंडित, गयाबाई दुशिंग, कल्पना ढोकणे तर गणराज शेतकरी मंडळाचे नेतृत्व डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी संचालक साहेबराव दुशिंग, नवनाथ ढोकणे, रंगनाथ गुंजाळ, गंगाधर ढोकणे, कारभारी ढोकणे, गोरक्षनाथ दुशिंग आदी करीत आहेत. या मंडळाचे पुढीलप्रमाणे उमेदवार, सुरेश ढोकणे, दत्तात्रय ढोकणे, चांगदेव ढोकणे, राजेंद्र दुशिंग, दत्तू ढोकणे, मच्छिंद्र ढोकणे, शहराम आलवणे, नामदेव भापकर, विलास ढोकणे, दीपक पंडित, भामाबाई दारकुंडे, मीरबाई काळे हे उमेदवार आहेत.

राहुरी तालुक्यातील राजकीय भवितव्य या निवडणुकीवर अवलंबून असते. त्यामुळे ही निवडणूक अतिशय महत्त्वाची समजली जाते. निवडणुकीच्या कालखंडामध्ये अनेक आरोप-प्रत्यारोपांनी ही निवडणूक गाजणार असून मतदार राजा मात्र शांत भूमिकेत निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत. विविध कार्यकारी सहकारी संस्था ही कारखान्याचे चेअरमन नामदेवराव ढोकणे, माजी संचालक सुनील अडसुरे, यांच्या गटाच्या ताब्यात असून आता ही संस्था आपल्या ताब्यात खेचून आणण्यासाठी डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी संचालक साहेबराव दुशिंग, नवनाथ ढोकणे यांनी कंबर कसली आहे. ही संस्था कोणाच्या ताब्यात जाते? याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे.

प्रत्येक सहकारी सोसायटीमध्ये प्रवर्गाच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागते. त्याच पद्धतीने या निवडणुकीमध्ये प्रवर्गासाठी डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी संचालकांचे पुतणे एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढत असल्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. कारखान्याचे माजी संचालक कै. भिकाभाऊ ढोकणे यांचे पुतणे आदिनाथ सेवा मंडळाचे उमेदवार संदीप ढोकणे तर दुसरीकडे कारखान्याचे माजी संचालक कै. दगडूभाऊ ढोकणे यांचे पुतणे गणराज शेतकरी मंडळाकडून सोसायटीचे माजी चेअरमन विलास ढोकणे हे निवडणूक लढवत असून संपूर्ण सभासदांबरोबर राहुरी तालुक्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या