Friday, May 10, 2024
Homeनगरउंबरगाव येथील सरपंचपदाचा एक अर्ज अवैध

उंबरगाव येथील सरपंचपदाचा एक अर्ज अवैध

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सरपंचपदासाठी 38 तर सदस्यपदासाठी 136 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. काल झालेल्या छाननीत सरपंचपदाचा एक अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे. सदस्यपदासाठीचे 163 अर्ज वैैध ठरले असून सरपंचपदासाठी 37 अर्ज शिल्लक राहिले आहे.

- Advertisement -

श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बुद्रुुक, वांगी खुर्द, कमालपूर, माळेवाडी, उंबरगाव व खंडाळा या सहा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 54 सदस्यपदासाठी 163 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते तर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या 6 जागांसाठी 39 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. कमालपूर ग्रामपंचायतीत 7 सदस्यपदासाठी 7 उमेदवारी अर्ज तर सरपंचपदासाठी एकच अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. केवळ घोषणाच बाकी आहे.

सहा ग्रामपंचायतीच्या 54 सदस्यपदासाठी 163 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीत हे सर्व उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. तर सहा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 38 उमेदवारी अर्ज दाखल होते त्यापैकी केवळ सरपंचपदासाठी उंबरगाव येथील संगीता महेश खिलारी यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला असून त्यांचे 2001 नंतर चौथे अपत्य असल्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला असल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी सांगितले.

उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी किती उमेदवारी अर्ज माघारी होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. त्यानंतर गावागावांत किती पॅनल होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रत्येक गावात पॅनल किती होतील याचे चित्र दिसत असले तरी उमेदवारी अर्ज माघार कोण घेणार यावरच सर्व अवलंबून राहणार आहे. त्यामुळे आता उमेदवारी अर्ज माघारीच्या तारखेची सर्वांनाच प्रतिक्षा राहणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या