Saturday, April 27, 2024
Homeनाशिकआदिवासी विकास परिषदेतर्फे ६ जुलैला उलगुलान

आदिवासी विकास परिषदेतर्फे ६ जुलैला उलगुलान

नाशिक । Nashik

आदिवासी तरुणांची मोठ्या प्रमाणात असलेली बेरोजगारी ,पदोन्नती आरक्षण, पेसा कायदा पद भरती व विविध समस्या सोडवण्यासाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, महाराष्ट्रतर्फे (दि.६) व ७ जुलैला “जनाधिकार उलगुलान” रथ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने आदिवासींच्या समस्या न सुटल्याने 25 आमदार 4 खासदार यांना जाब विचारून विधानसभेत आणि पावसाळी अधिवेशनात आवाज उठवण्यात येऊन आदिवासी तरुणांची मोठ्या प्रमाणात असलेली बेरोजगारी ,पदोन्नती आरक्षण, पेसा कायदा पद भरती व विविध समस्या सोडवण्यासाठी तसेच त्यांना जाब विचारण्यासाठी ही रथ यात्रा आयोजित केली आहे.

- Advertisement -

मुंबईत (दि.६) जुलै रोजी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या बोरिवली, मुंबई येथील निवास्थानावर ही जनाधिकार उलगुलान रथ यात्रा जाऊन पोहचणार आहे.
त्यानंतर दि.७ जुलै रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगला निवास्थानावर जाऊन पोहचणार आहे.

दादर चैत्य भूमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून पुढे मुख्यमंत्री यांच्या वर्षा या बंगल्यावर रथयात्रा पोहचेल.महाराष्ट्रातील आदिवासी बांधवाना सर्व संघटनांनी या जनाधिकार उलगुलान रथयात्रेत सहभागी होऊन आपल्या मागण्या, आपले हक्क मागण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या