Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशRussia-Ukraine Crisis : शस्त्र वापरता येणाऱ्यांनी लष्करात सहभागी व्हावे; युक्रेनचे आवाहन

Russia-Ukraine Crisis : शस्त्र वापरता येणाऱ्यांनी लष्करात सहभागी व्हावे; युक्रेनचे आवाहन

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

रशियाने युक्रेनवर (Russia-Ukraine War) आज हल्ला केला आहे. युक्रेनमध्ये (Ukraine) तणाव निर्माण झाला असून आता युक्रेनच्या संरक्षण मंत्र्यांनी शस्त्र वापरता येणाऱ्यांना लष्करामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे…

- Advertisement -

युक्रेन-रशिया युद्ध सुरू झाले आहे. मात्र रशियाच्या तुलनेत युक्रेनकडे सैन्य अत्यंत कमी आहे. त्यामुळे आता युक्रेनच्या संरक्षण मंत्र्यांनी जनतेला आवाहन केले आहे. ज्यांना शस्त्र वापरता येतात किंवा ज्यांची तयारी आहे त्यांनी प्रादेशिक संरक्षण दलामध्ये सहभागी व्हावे आणि राष्ट्राला मदत करावी, असे आवाहन युक्रेनचे संरक्षण मंत्री ओलेक्सी रेझनिकोव्ह म्हणाले.

Russia-Ukraine Crisis : रशियाकडून युद्धाची घाेषणा; अमेरिकेसह युरोपला पुतीन यांचा इशारा

दरम्यान, रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनमधून विदारक चित्र समोर आले आहे. रशियाकडून सातत्याने बॉम्ब हल्ले (Bomb Blast) सुरूच आहेत. रशियाने राजधानी कीव्हच्या जवळ असलेल्या बोरिसपिल विमानतळ आणि इतर विमानतळांवर क्षेपणास्त्राद्वारे हल्ला (Attack) केला आहे.

आईसह बहिणींवर अत्याचार; मुलीच्या तक्रारीवरून भोंदूबाबास बेड्या

पुतीन यांनी आज युक्रेनवर हल्ला करण्याची घोषणा केली. त्यानंतर युक्रेनच्या लष्करी तळांवर जोरदार बॉम्बहल्ले करण्यात आले. मात्र रशियाने युक्रेनमधील शहरांवर हल्ला करत असल्याच्या वृत्ताला नकार दिला आहे. रशिया युक्रेनमधील लष्कराच्या पायाभूत सुविधा, हवाई संरक्षण आणि हवाई दलाला लक्ष्य करत असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या