माणुसकी ओशाळली! अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मदतीसाठी अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेत दारोदार फिरली पण…

jalgaon-digital
2 Min Read

उज्जैन | Ujjain

मध्य प्रदेशातील उज्जैन मधून माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका १२ वर्षीय मुलीवर अमानवी अत्याचार करून नराधमांनी तिला रस्त्यावर फेकलं आहे.

यानंतर अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेतील पीडिता मदतीसाठी अर्धनग्न व रक्तबंबाळ अवस्थेत दारोदार फिरत होती, परंतु पीडितेच्या मदतीला कोणीच धावले नाही. पीडितेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मध्यप्रदेशातील महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

Iraq Wedding Fire : लग्नसोहळ्यात अग्नी तांडव! वधू-वरासह वऱ्हाडी होरपळले, १०० जणांचा दुर्दैवी मृत्यू

पोलिसांनी मुलीला उपचारासाठी चरक रुग्णालयात दाखल केले, तिची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी तिला इंदूरला रेफर केले. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या प्रकृती खालावत चालल्याने पोलिसांनी स्वतः रक्त देऊन वाचवले. मात्र, तिच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर इजा झाल्यामुळे तिचे खूप रक्त वाया गेले होते. या संपूर्ण प्रकरणात उज्जैन एसपींनी एसआयटी स्थापन केली आहे. अत्याचारानंतर मुलीने काही लोकांकडे मदत मागितली. मात्र, कोणीही तिला मदत केली नाही.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

…अन् ट्रेन थेट प्लॅटफॉर्मवर चढली! मथुरामध्ये विचित्र अपघात

उज्जैनचे एसपी सचिन शर्मा यांनी सांगितले की, महाकाल पोलिस स्टेशन हद्दीतील बडनगर रोडवरील मुरलीपुरा येथील दांडी आश्रमाजवळ मुलगी जखमी अवस्थेत आढळली. यानंतर तिला चरक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलीला जास्त रक्तस्त्राव होत असल्याने पोलिसांनी तिला रक्त देऊन मदत केली. एसपी म्हणाले की, तरुणीच्या बोलण्यावरून ती प्रयागराज (यूपी) येथील रहिवासी असल्याचे दिसते. तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. मुलीला बोलता येत नसल्याने ही घटना कुठे घडली हे कळू शकले नाही. सध्या अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.

या घटनेवर, माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ट्विट केले की, ‘अशी घृणास्पद घटना प्रशासन आणि समाजावर डाग आहे. मला मुख्यमंत्र्यांकडून जाणून घ्यायचे आहे की, तुम्ही फक्त निवडणुका लढवत राहणार आणि खोट्या घोषणा करत राहणार का? त्यांनी पुढे लिहिले की, ‘मुख्यमंत्री असूनही मध्य प्रदेश मुख्यमंत्री नसलेलं राज्य बनलं आहे. गुन्हेगार निर्दयी असून जनता त्रस्त आहे. गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी माझी मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे. पीडितेला योग्य उपचारासोबतच एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *