Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकत्र्यंबकेश्वर महाविद्यालयास युजीसीची मान्यता

त्र्यंबकेश्वर महाविद्यालयास युजीसीची मान्यता

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwer

दिल्लीच्या विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकतीच 2(एफ)12(बी)ही मान्यता देऊन महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

- Advertisement -

गेल्या दहा वर्षांपासून संस्था आणि महाविद्यालयीन पातळीवर ही मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू होते, अखेर मान्यता मिळाली.

या मान्यतेमुळे UGC कायदा 1956 च्या 2 (फ) आणि 12 (ब) परिच्छेदानुसार मिळणाऱ्या केंद्रीय सवलती साठी हे महाविद्यालय आता पात्र झालेआहे. युजीसी कडून

मिळणाऱ्या सवलती या विद्यार्थी आणि विद्यार्थीनींसाठी वसतिगृह, स्वतंत्र ग्रंथालय इमारत, ओरिएंटेशन आणि रिफ्रेशर वर्गासाठी प्राध्यापकांना अनुदान, UGC च्या लघु आणि दीर्घ स्वरूपाच्या संशोधन प्रकल्पासाठी प्राध्यापकांना आता अनुदान मिळू शकेल, इतर देशामध्ये परिसंवादासाठी प्राध्यापक गेल्यास प्रवासासाठी अनुदान मिळू शकेल,

NAAC च्या मानांकनात जर 2.50 पेक्षा जास्त गुण असतील तर RUSA च्या कोट्यावधी रुपयांच्या अनुदानासाठी अर्ज करता येतो.

कोणत्याही निधी देणाऱ्या संस्था प्रथम महाविद्यालय UGC च्या 2 (फ) आणि 12 (ब) या यादी मध्ये आहे का हे पाहतात. त्यामुळे माहाविद्यालयाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

या मान्यतेसाठी मविप्र सरचिटणीस श्रीमती निलिमा पवार, संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, कार्यकारिणी संचालक सचिन पिंगळे, शिक्षणाधिकारी डॉ डी .डी.काजळे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या प्रयत्नांना यश आल्याने महाविद्यालय परिवारात आंनदाचे वातावरण पसरले आहे.

या मोहिमेत मोलाची भूमिका महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच सर्व प्राध्यापक वर्गाने मोलाचे योगदान दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या