सिन्नर । प्रतिनिधी Sinnar
तालुक्यातील उद्योजकांच्या समस्या सावडवण्यासाठी उद्योजक विकास पॅनलला ( Udyog Vikas Panel ) माझी साथ असून त्यांच्या माध्यमातून विविध अडचणी सोडवण्यासाठी नेहमी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार माणिकराव कोकाटे ( MLA Manikrao Kokate ) यांनी केले.
सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीच्या पंचवार्षिक निवडणूकीच ( STICE Election) धुरळा उडाला असून उद्योजक विकास पॅनलकडून नुकतीच आ. कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराची सुरुवात करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. उद्योजक विकास पॅनलकडून उमेदवारांसोबत विविध कंपन्यांमध्ये जाऊन प्रचार केला जात आहे.
येणार्या काळात सिन्नर तालुका आद्योगिक सहकारी वसाहत येथे सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात येत आहे. जेष्ठ 11 उद्योजकांच्या कंपनीत जाऊन त्यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ वाढवण्यात येत आहे. या अभिनव संकल्पनेचे उद्योजकांकडुन उस्फुर्त स्वागत करण्यात येत आहे. यावेळी पॅनलचे उमेदवार अविनाश तांबे, पंडितराव लोंढे, सुधा माळोदे-गडाख, रामदास दराडे, बाबासाहेब दळवी, श्रीहरी नावंदर, कैलास हांडोरे यांच्यासह उमेदवार उपस्थित होते.