उद्धव ठाकरे : लोकनायक होण्याच्या दिशेने वाटचाल

भारतीय राजकारणात वावरतानाही समाजकारणाचा जास्त विचार करणारे तसेच गट व पक्ष यापेक्षा माणूस केंद्रस्थानी मानणारे व या स्वभावामुळे स्वतःबद्दल नैसर्गिक आत्मियता निर्माण करणारे लोक नेते आहेत त्यात स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव अग्रक्रमाने घेता येईल.

त्यांच्यानंतर शरद पवार, नितीन गडकरी या महाराष्ट्रीय विद्यमान नेत्यांचा क्रम लागतो. या पंक्तीत उद्धव ठाकरे यांचे नाव समाविष्ट करणे वावगे ठरणार नाही. 27 जून 1960 रोजी 10.14 वाजता त्यांचा जन्म मुंबई येथे झाला.

जन्म राशी सिंह तर नक्षत्र पूर्वा-2. ठाकरे यांच्या ग्रहस्थितीत 29 जून 2019 पासून झपाट्याने बदल होत आहे. 15 डिसेंबर 2028 पर्यंत त्यांच्या राजकीय यशाची कमान उंचावत राहण्याचे योग आहेत.

कन्या लग्न व सिंह राशी असल्याने धाडस आणि संवेदनशीलतेचा स्वभावात असलेला संगम जनसामान्यांच्या मनात लोकनायक म्हणून त्यांना विराजमान करणार, असे ग्रहसंकेत आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतर मराठी नेत्याला केंद्रात मोठी जबाबदारी मिळेल, असे योग आहेत. त्यादृष्टीने ठाकरेंची वाटचाल होणार का, हे पुढील काही वर्षात दिसणार आहे. आगामी लोकसभेपूर्वी मोठी जबाबदारी आणि धाडसी निर्णयांसाठी सज्ज राहावे, असे संकेत ग्रहस्थिती त्यांना देते. मात्र त्यासोबत काही गोष्टी संतुलित करणे त्यांच्यासाठी हितकारक ठरेल.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *