Thursday, May 9, 2024
Homeनगरजिल्हा बँकेच्या चेअरमनपदी उदय शेळके तर व्हाईस चेअरमनपदी माधवराव कानवडे

जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी उदय शेळके तर व्हाईस चेअरमनपदी माधवराव कानवडे

अहमदनगर | प्रतिनिधी

जिल्हा बँकेच्या नूतन चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत…

- Advertisement -

चेअरमनपदी उदय शेळके यांची निवड झाली.

तत्पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्रीताई घुले यांच्या बंगल्यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे उपस्थितीत बँकेच्या संचालकांची बैठक झाली.

डॉ.संजय मालपाणी यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट

बैठकीला संचालक शिवाजीराव कर्डिले, विवेक कोल्हे हे देखील उपस्थित होते. त्यानंतर १२.३० वाजता संचालक बँकेच्या सभागृहात आले.

या ठिकाणी निवडणुक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या बैठकीत चेअरमनपदी उदय शेळके यांची तर व्हाईस चेअरमन पदी माधवराव कानवडे यांची निवड करण्यात आली.

दरम्यान, उदय शेळके पारनेर तालुका सेवा सोसायटी मतदारसंघातून विजयी झाले होते. शेळके यांनी विरोधी रामदास भोसले यांचा ९९ मताने पराभव केला होता. तर माधवराव कानवडे संगमनेर सोसायटी मतदार संघातून बिनविरोध निवडून आले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या