Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याउदय सामंत आणि छत्रपती संभाजीराजेंच्या बोटीला अपघात

उदय सामंत आणि छत्रपती संभाजीराजेंच्या बोटीला अपघात

मुंबई | Mumbai

महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या बोटीला अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

संबंधित दुर्घटना ही मांडवा येथे घडली आहे. मांडव्यात बोट जेटीला धडकल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

बोटीवरील सर्वजण सध्या सुखरुप असल्याची माहिती समोर येतेय. बोटीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला अशी चर्चा आहे. पण ही घटना नेमकी कशी घडली याबाबत अधिकृत माहिती प्रशासनाकडून जारी करण्यात आलेली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या