Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशमहाराष्ट्राचे सुपुत्र उदय लळीत होणार भारताचे सरन्यायाधीश

महाराष्ट्राचे सुपुत्र उदय लळीत होणार भारताचे सरन्यायाधीश

दिल्ली | Delhi

महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती उदय लळीत (Uday Lalit) हे देशाचे ४९ वे सरन्यायाधीश (Chief Justice) म्हणून येत्या २७ ऑगस्टला पदभार स्वीकारणार आहेत. भारताचे विद्यमान सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा ऑगस्टमध्ये सेवानिवृत्त होत आहेत.

- Advertisement -

न्या. उदय लळीत हे महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्याचे सुपुत्र आहेत. गिर्ये-कोठारवाडी येथे त्यांचे मूळ घर आहे. नृसिंह लक्ष्मीचे मंदिर लळीत कुटुंबाची कुलदेवता आहे. उदय लळीत यांचे शिक्षण मुंबईत झाले. पण मूळगाव आजही त्यांच्यासाठी विशेष आहे.

उदय लळीत यांचे वडील अॅड. उमेश लळीत हेही मुंबई उच्च न्यायालयाने नामनिर्देशित केलेले ज्येष्ठ वकील होते. ते १९७४ ते ७६ या काळात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे माजी अतिरिक्त न्यायाधीश होते. या पार्श्वभूमीवर मुंबईत त्यांचे शिक्षण पूर्ण झाले.

जून १९८३ मध्ये न्यायाधीश उदय लळीत यांनी वकिलीला सुरुवात केली. उदय लळीत यांनी दिवंगत ज्येष्ठ वकील एम. ए. राणे यांच्याकडे सुरुवातीची काही वर्ष वकिली केली. नंतर ते दिल्लीत गेले.

उदय लळीत अनेक वर्षे सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्रपणे वकिली करीत आहेत. विशेष पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून नेमणूक असलेले उदय लळीत मितभाषी, निर्गवी आणि सदा हसतमुख असतात. गत काही वर्षांत सर्वोच्च न्यायालयात हाय प्रोफाईल प्रकरणे चालूनही ते प्रसिद्धीपासून पूर्णपणे अलिप्त राहिले आहेत.

८० हजार पानांच्या कागदपत्रांचा डोंगर सांभाळत त्यांनी ‘2जीस्पेक्ट्रम’ हा देशाच्या इतिहासातील सर्वांत मोठा भ‘ष्टाचार खटला चालवला. सुमारे १.७० लाख कोटी रुपयांच्या ‘2जीस्पेक्ट्रम’ वाटप घोटाळ्याशी संबंधित अभियोग चालवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या अनुच्छेद १४२अन्वये विशेष अधिकार वापरून ज्येष्ठ वकील उदय लळीत यांची विशेष पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून नेमणूक केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या