Tuesday, April 23, 2024
Homeदेश विदेशमोठी बातमी! Uber चे संपूर्ण नेटवर्क हॅक

मोठी बातमी! Uber चे संपूर्ण नेटवर्क हॅक

नाशिक | Nashik

Uber कंपनीचे त्यांचे नेटवर्क हॅक झाल्याची घटना घडली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे उबेरला अनेक अंतर्गत संप्रेषण (Internal Communications) आणि अभियांत्रिकी प्रणाली ( Engineering Systems) ऑफलाइन करण्यास भाग पाडले आहे.

- Advertisement -

नक्की काय झाले?

एका हॅकरने Uber मध्ये अंतर्गत वापरात असलेल्या मेसेजिंग “स्लॅक ॲप हॅक केले आणि नंतर उबेरच्या कर्मचार्‍यांना संदेश पाठवण्यासाठी त्याचा वापर केला. कर्मचाऱ्यांना डेटाचे उल्लंघन झाले आहे असे मेसेज करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

हॅकरने Uber चे Domain, AWS, vSphere, gsuit SA या सर्व ॲप चे Admin IDs आणि HackerOne account हॅक केल्याचा दावा केला आहे.

सायबर हल्ल्याची सुरुवात सोशल इंजिनिअरिंग करून एका कर्मचाऱ्याच्या क्रेडेन्शियल्सश मिळवण्यात आले आणि ते वापरून संपूर्ण हल्ल्याची योजना आखण्यात आली आहे, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.

आजच्या काळात आणि डिजिटल युगात तुम्ही लहान कंपनी असो किंवा मोठी, सर्वच कंपन्या सायबर हल्ल्याला बळी पडू शकता. सर्वांनी सायबर जागरूक असणे हे आता काळाची गरज आहे.

साईनाथ नागरे, उपमहाव्यवस्थापक, सायबर सिक्युरिटी, रिलायन्स इंडस्ट्रीज.

हॅकर्स हे विविध पद्धतीने कंपनी वरती अटॅक करून मोठ्या कंपन्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात. यापासून सुरक्षित राहण्यासाठी कंपनीमधील प्रत्येक एम्प्लॉईला सायबर सुरक्षेचे ट्रेनिंग देणे असून सायबर सुरक्षा वैज्ञानिकांकडून संबंधित एप्लीकेशन अथवा वेबसाईट मध्ये काही त्रुटी आहेत का हे तपासून अपडेट करणे आवश्यक आहे.

तन्मय दीक्षित, सायबर तज्ञ, नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या