कारागृहात पिस्तूल पुरवणार्‍या दोघं तरुणांना अटक

जळगाव | प्रतिनिधी
जिल्हा कारागृहात कैद्यांना गावठी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस पुरविणार्‍या दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी अटक केली. ऑनलाइनच्या माध्यमातून दोघांना न्यायालयात हजर केले असता…

त्यांना ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीच्या शोधात अजून पोलीस आहेत.
याप्रकरणी नागेश मुकुंदा पिंगळे (वय २१, अमळनेर) आणि अमीत ऊर्फ नीतेश सुदर्शन चौधरी ऊर्फ बिहारी (मूळ रा.बिहार, ह.मु.रामेश्‍वर कॉलनी, जळगाव) यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुशील मगरे आणि गौरव पाटील यांचा शोध पोलीस घेत आहेत. या मुख्य आरोपींबाबत अटकेतील दोघांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. परंतु, दोघं जण तपासात सहकार्य न करता उडवा उडवीचे उत्तरे देत आहेत, अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली.
या गुन्ह्यात अमीत ऊर्फ बिहारी आणि पिंगळे याने गणेशनगराकडून कारागृहाच्या भींतीवरुन आत पिस्तूल आणि काडतूस फेकले होते. हे पिस्तूल व काडतूस मगरे यास पुरवण्यात आले. त्यांनी हे पिस्तूल व काडतूस शिंदखेडा येथून आणले होते. अटकेतील दोघांनी कोथरुड (पुणे) येथील सोन्याच्या दुकानात सशस्त्र दरोडा सुद्धा टाकला होतो. त्या गुन्ह्यात सुशील मगरे याच्यासह अटकेतील अमीत बिहारी याचा देखील सहभाग आहे. बिहारी सध्या रामेश्‍वर कॉलनीत त्याच्या वडिलांसोबत इलेक्ट्रीक काम करतो, अशी माहिती पोलीस तपासात समोर येत आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *