Thursday, April 25, 2024
Homeनगरदुचाकी चोरट्यांचा हैदोस; पाच दुचाकी चोरल्या

दुचाकी चोरट्यांचा हैदोस; पाच दुचाकी चोरल्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहर, उपनगरातून दुचाकी चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सर्वच पोलीस ठाणे हद्दीतून दुचाकी चोरीला जात आहेत. पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतरही दुचाकी चोरीचा तपास लागत नाही. कोतवालीतून दोन तर तोफखाना, भिंगार कॅम्प व एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतून प्रत्येकी एक अशा पाच दुचाकी चोरीला गेल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यात काल दाखल झाल्या आहेत.

- Advertisement -

नगर कॉलेजच्या पाठीमागील एनसीसी ग्राउंडमधून सनी रमेश शिंदे (रा. नागरदेवळे ता. नगर) यांची दुचाकी चोरीला गेली. शिंदे यांनी कोतवाली पोलिसांत फिर्याद दिली आहे. मार्केट यार्ड येथील त्रिमुखे हॉस्पिटलच्या खाली जिन्याजवळून मार्कस मारूती बोरूडे (रा. बोल्हेगाव) यांची दुचाकी चोरीला गेली. बोरूडे यांनी कोतवाली पोलिसांत फिर्याद दिली आहे. एमआयडीसीतील रेणुकामाता मंदिराच्या गेटसमोरून दत्तात्रय पोपट विटेकर (रा. नवनागापूर) यांची दुचाकी चोरीला गेली.

विटेकर यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली आहे. प्रेमदान चौकातील शाही इन हॉटेलसमोरून रामकृष्ण लक्ष्मण पिंपळे (रा. सावेडी) यांची दुचाकी चोरीला गेली. पिंपळे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भिंगारमधील तुक्कड ओढा येथून संकेत विठ्ठल बेरड (रा. तुक्कड ओढा) यांची दुचाकी चोरीला गेली. बेरड यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोठे रॅकेट

शहर, उपनगर व नगर तालुक्यातील अनेक गावांमधून दुचाकी चोरीला जाण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. दुचाकी चोरीला गेल्यानंतर तिचा तपास लागण्याची शक्यता कमीच आहे. पण एकाचवेळी अनेक दुचाकी चोरून त्या नगरबाहेर नेऊन विक्री केल्या जात असल्याची शक्यता आहे. यामागे अनेक टोळ्या कार्यरत असून मोठे रॅकेट असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या