Saturday, April 27, 2024
Homeजळगावजरंडी येथे दहा फुटाच्या अजगरासह पकडले दोन विषारी नाग

जरंडी येथे दहा फुटाच्या अजगरासह पकडले दोन विषारी नाग

जरंडी, Jarandi ता.सोयगाव

येथील विहीरीत पडलेले (lying in a well) दहा फुटाचे अजस्त्र अजगर (python) सर्पमित्र, (Sarpamitra) वनविभागाकडुन (Forest Department) मोठ्या शिताफीने बाहेर काढत मंगळवारी (ता. ३०) एकाच दिवसात पकडलेल्या (caught) अजगरासह दोन विषारी नाग (Two venomous snakes) आणि दोन बिनविषारी सापांना नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.

- Advertisement -

वाडी सुतांडा शिवारातील गट क्रमांक-१८५ मधील शिवाजी कऱ्हाळे यांच्या शेतातील विहीरीत दहा फुटाचा अजस्त्र अजगर गेल्या पंधरा दिवसांपासून पडले होते. भले मोठे अजगर त्यात विहीरीतील अडचणीने अजगर पकडण्यास कोणीही धजावत नव्हते.

शेवटी त्यांनी बनोटी वनविभागास माहीती दिल्यावर वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ, वनपाल मुख्तार अली, वनरक्षक (सर्पमित्र) सुदाम राठोड यांनी विहीरीची पहाणी करीत सर्पमित्र संदीप चव्हाण, सलमान पठाण, मयूर पवार, अमजत पठाण सोबत घेत विहिरीत उतरून चार तास परिश्रम घेत मोठ्या शिताफीने अजगरास विहीरी बाहेर काढण्यात यश आले.

मंगळवारी बनोटी परिसरात एकाच दिवशी तिडका, हनुमंतखेडा येथे पकडण्यात आलेले दोन विषारी नाग, पळाशी येथे एक धामिन आणि बनोटी तांडा येथे एक तस्कर जातीचा विनविषारी साप वनविभागातील कर्मचारी आणि सर्पमित्र सुदाम राठोड यांनी पकडत बनोटी जंगलातील नैसर्गीक अधिवासात सोडुन देण्यात आले यावेळी वनपाल मुख्तार अली, वनरक्षक सुदाम राठोड, नितीन सोनवणे, महादू शिंदे, कैलास राठोड उपस्थित होते.

घरातील शिळे अन्न घराहेर फेकल्याने उंदिर जमा होतात आणि उंदराच्या शोधात साप येत असल्याने स्वच्छता राखा. पाण्यातील डासांची अंडी साप खात असल्याने डेंगू आणि मलेरिया पासुन आपले संरक्षण होत असल्याने भिती पोटी सापांना मारु नका वनविभाग किंवा सर्पमित्राना कळवा असे आवाहन यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या