Monday, April 29, 2024
Homeजळगावसोयगाव जवळील अपघातात दोघे गंभीर

सोयगाव जवळील अपघातात दोघे गंभीर

जरंडी Jarandi

लिहातांड्यावरून शेत मजूर घेऊन जाणारी अपे रिक्षा (Ape rickshaw) व जरंडी वरून सोयगाव कडे जाणारी मोटारसायकल (Motorcycle) दोघांचा सोयगाव जवळील गवळण नाल्यात खड्डे चुकवितांना (Avoiding potholes) समोर समोर धडक (Front to front collision) होऊन गंभीर अपघात (accident) झाल्याची घटना शनिवारी सोयगाव (Soigaon) जवळ घडली. या अपघातात जरंडी कडून सोयगावला जाणाऱ्या मोटारसायकलचा चुराडा झाला असून मोटारसायकल वरील दोघे तरुण (Two serious) गंभीर जखमी झाले आहे.याप्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद घेण्यात आली आहे.

- Advertisement -

सोयगाव कडून जरंडीकडे मजूर घेऊन येणारी अपे रिक्षा क्र-एम-एच-१९ ८८०४ ही सोयगाव जवळील गवळण नाल्यात आली असतांना जरंडी कडून मोटारसायकल क्र-एम-एच २० ९३७८ ही गवळण नाल्या जवळ असताना दोघे वाहने खड्डे चुकविण्याच्या नादात समोरासमोर आदळल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकल वरील तरुण एकनाथ उर्फ बबन शेनफडू ,तोरे, बबलू सीताराम उसरे (दोन्ही रा.जरंडी) गंभीर जखमी झाले. तर रिक्षा चालक भोला संतोष जाधव(रा.लिहातांडा, ता जामनेर) हा किरकोळ जखमी झाला आहे. वरील जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून गंभीर जखमी असलेले बबन तोरे व बबलू उसरे यांना बुलढाणा व औरंगाबाद येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.

दरम्यान अपघाताची नोंद सोयगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिस सहायक निरीक्षक अनमोल केदार यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार राजू बर्डे,पो. कॉ. रवींद्र तायडे, रोकडे, अजय कोळी हे करीत आहे.

सोयगाव-जरंडी रस्त्यावर मोठमोठे खड्डे

सोयगाव-जरंडी रस्त्यावर मोठमोठे खड्डे झालेले असून या रस्त्याची संबंधित विभागाकडून पाच वर्षात अद्यापही डागडुजी करण्यात आलेली नाही सोयगाव शहरापासून खड्डे मय रस्ते सुरू होत असून शहरातून च या रस्त्यावर प्रवास करतांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. दरम्यान सोयगाव च्या गवळण नाल्या वर या रस्त्यावर वळण रस्ता असून संबंधित विभागाकडून दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाही त्यामुळे गवळण नाल्या वरील रस्ता धोक्याचा वळण रस्ता झालेला आहे.

गुन्हा दाखल करणार

सोयगाव शहरापासून ते गवळण नाल्या पर्यंतच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे झालेले असून यावर अद्याप डागडुजी करण्यात आलेली नसून गवळण नाल्या वर या रस्त्याच्या दुतर्फा साईड पट्टे तयार करण्यात आलेले नसून या वळण रस्त्यावर बाजू धोकादायक झाल्या आहेत. त्यामुळे वाहनधारक रस्त्यावरील पुलाच्या खाली कोसळण्याची भीती झालेली आहे. याबाबत प्रहार क्रांती अपंग चे तालुकाध्यक्ष संदीप इंगळे संबंधित ठेकेदार व सार्वजनिक विभागावर सोयगाव पोलिसात गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या