टू प्लसमधील आरोपींना एसपींनी दिली एक संधी

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या संकल्पनेतून मार्ग चुकून गुन्हेगारीकडे वळालेले रेकॉर्ड वरील सराइत गुन्हेगारांना गुन्हेगारीवृत्तीपासून

परावृत्त करण्यासाठी शनिवारी शहरातील तोफखाना, भिंगार कँम्प पोलीस ठाण्याअंतर्गत रेकॉडवरील आरोपींचा मेळावा आयोजित करणात आला होता. टू प्लस मधील सर्व आरोपींची प्रत्यक्ष पाहणी करून पुन्हा गुन्हे केल्यास कारवाई केली जाईल, अशी तंबी सर्व उपस्थित आरोपींना पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

यावेळी भिंगार कॅम्पचे शिशिरकुमार देशमुख यांनी उपस्थित आरोपींची जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना माहिती दिली. पाटील यांनी काही आरोपींना महिन्यातून एकदा भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यास सांगितले. या दरम्यान 40 ते 45 आरोपी यावेळी उपस्थित होते.

नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे, भिंगार कॅम्पचे सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख आदींसह भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तसेच तोफखाना पोलीस ठाण्याअंतर्गत संजोग लॉन येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी रेकॉर्डवरील सराइत 40 आरोपींनी हजेरी लावली.

गुन्हेगारी वृत्ती सोडून समाजात सन्मानाने व प्रतिष्ठेने जगण्याबाबत तसेच गुन्हेगारी सोडून योग्य कामधंदा करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड, प्रवक्ते एस.एस सुभाष सोनवणे, तसेच 370 मधील आरोपीने जेलमध्ये आलेले अनुभव कथन केले.

गुन्हेगारी सोडून त्यामधून कसे बाहेर पडायचे हे त्यांनी सांगितले. यावेळी सहायक पोलीस पोलीस निरीक्षक मेढे, रविंद्र पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक समाधान सोलंकी, तसेच तपासी पोलीस अधीकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article