Thursday, April 25, 2024
HomeनाशिकNashik : पिकअपचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, अनेक जखमी

Nashik : पिकअपचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, अनेक जखमी

सुरगाणा | वार्ताहर | Surgana

तालुक्यातील वाघधोंड (Waghdond) येथे नववधूला आणण्यासाठी गेलेल्या सासरच्या मंडळीच्या गाडीचा भीषण अपघात (Terrible Accident)होऊन दोघांचा मृत्यू (Death) झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे….

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, वाघधोंड येथील नवरदेवाचा शिंगळचोंड येथील वधूशी थाटामाटात विवाह (Marriage) झाला होता. त्यानंतर पाच दिवसांनी नववधूला घेण्यासाठी सासरचे २० ते २५ जण एम.एच.१५ एच.एच.९७८७ या पिकअप वाहनाने गेले होते. यावेळी वाघधोंड गावाजवळ आल्यावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप १५ ते २० फुट खोल असलेल्या दरीत कोसळली. त्यावेळी या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू तर १० हून अधिक जण गंभीर जखमी (Wounded) झाले.

ट्रक आणि पिकअपच्या भीषण अपघातात ११ ठार

दरम्यान, या अपघातात कमी सयाजी देशमुख (७०) रा. वाघधोंड यांचा जागीच तर हेमराज रमेश थविल (१०) रा. गारमाळ या बालकाचा उपचारावेळी मृत्यू झाला. तर अपघातात १० हून अधिक जण गंभीर जखमी झाले असून ते सर्व वाघधोंड येथील रहिवासी आहेत. तसेच जखमींना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा ग्रामीण रुग्णालयात (Nashik District Rural Hospital) दाखल करण्यात आले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

जखमींची नावे खालीलप्रमाणे

प्रल्हाद लक्ष्मण महाले (१६) रा.गणेशनगर, मिनाबाई गोविंद गावित (५६) सुमन यशवंत देशमुख (३२) जानकी रामदास जाधव (३२) रंगुबाई सीताराम देशमुख (६५) अनु रोहिदास देशमुख (६०) पार्वती पुंडलिक देशमुख (६५) लिलाबाई हरी देशमुख (४५) परिबाई भगवान देशमुख (५०) वंदना रोहिदास देशमुख (२६) चंद्राबाई काळू देशमुख (६५) प्रमिला चंदर भोये (४५) यमुना माधव जाधव (४०) श्रीराम लहानु चौधरी (४५) शेवंताबाई काशिनाथ गुंबाडे (५०)

- Advertisment -

ताज्या बातम्या