Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकइमारतीवरून पडून दोघांचा मृत्यू

इमारतीवरून पडून दोघांचा मृत्यू

नाशिक । Nashik

शहरात विविध घटनांमध्ये इमारतीवरून पडून दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटना बुधवारी (दि.25) घडल्या. यामध्ये एका 12 वर्षीय बालिकेचा व एका सुरक्षा रक्षकाचा सामावेश आहे.

- Advertisement -

पहिली घटना चेतनानगर परिसरात घडली. तिरूमला आशियाना बिल्डींगमध्ये राहारणारी 12 वर्षीय विश्वा रोहिदास बाविस्कर बुधवारी रात्री दहा वाजता ही खेळण्यसाठी जात असताना वरच्या मजल्यावरून पाय घसरून ती खाली पडल्याने डोक्यास गंभीर मार लागून जखमी झाली होती. तीला तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तत्पुर्वीच तीचा मृत्यू झाला होता.

दुसरी घटना कमोदनगर परिसरात घडली. येथील प्लॅटिनम टावर्स इमारतीचा सुरक्षा रक्षक नितीन दगडूबा गाडेकर (20) हा 7 व्या मजल्यावरील गॅलरीतून खाली पडल्याने गंभीर जखमी झाला होता. त्यास जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता मयत घोषीत करण्यात आले. या दोन्ही प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या