Wednesday, April 24, 2024
Homeनगरशेततळ्यात बुडून दोघांचा मृत्यू

शेततळ्यात बुडून दोघांचा मृत्यू

वैजापूर |प्रतिनिधी| Vaijapur

शेततळ्यात बुडून दोघांचा मृत्यू (Two Death Drowning in the Farm Pond) झाल्याची घटना वैजापुर (Vaijapur) तालुक्यातील बेलगाव (Belgav) शिवारात रविवार रोजी दुपारच्या सुमारास घडली. कपिल किरण त्रिभुवन (वय 21 रा. बेलगाव), पीयूष विजय जिवडे (वय 8 रा. नाशिक) असे या घटनेतील मयतांची नावे आहेत.

- Advertisement -

पवारांनी ‘राष्ट्रवादी’ला संभ्रमात टाकले

या घटनेची पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जागरण गोंधळ करणारे वाघे हे कासली (Kasali) येथे जात असतांना बेलगाव शिवारात आराम करण्यासाठी थांबले. यातच त्यांच्या सोबत असलेला चिमुकला पीयूष विजय जिवडे हा खेळत असतांना नकळत बेलगाव शिवारातील गट क्रमांक 160 मधील किरण पांडुरंग त्रिभुवन यांच्या शेतातील शेततळ्यात (Farm Pond) खेळतांना पडला. ही घटना कपिल किरण त्रिभुवन याने बघितल्यावर कपिलने चिमुकल्याला वाचवण्यासाठी धाडसाने तळ्यात उडी टाकली. मात्र अंदाज न आल्याने तो ही पाण्यात बुडला व दुर्दैवाने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू (Death) झाला.

कार अपघातात बालक ठार, 6 जखमी

घटनेची माहिती मिळताच पोलीस नाईक सिंगल व पोलीस पाटील अनिल धीवर यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने दोघांना बेशुद्ध अवस्थेत पाण्यातून (water) बाहेर काढत वैजापूर (Vaijapur) येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. कपिल हा एकुलता एक होता व तो अभ्यासात देखील हुशार होता तो कोपरगाव (Kopargav) येथील संजीवनी महाविद्यालयात अभियांत्रिकीमध्ये तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

समृद्धी महामार्गात बाधित शाळा जागेचा व इमारतीचा वाद निकालीसाईबाबांविषयी चुकीची माहिती पसरविल्यास कठोर कारवाई करणार

- Advertisment -

ताज्या बातम्या