Tuesday, April 23, 2024
Homeदेश विदेशअभियंत्याच्या उपचारासाठी दोन कोटींची गरज ; आतापर्यंत 65 लाख जमा

अभियंत्याच्या उपचारासाठी दोन कोटींची गरज ; आतापर्यंत 65 लाख जमा

भुवनेश्‍वर – करोनाची लागण झाल्यामुळे मरणाशी झुंज देत असलेला युवा अभियंता अमृत प्रधान याच्यावरील उपचारासाठी क्राऊड फंडिंगच्या (समाज माध्यमातून आर्थिक मदत जमा करणे) माध्यमातून आतापर्यंत 65 लाख इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे. उपचारासाठी एकूण दोन कोटी रुपयांची गरज असल्याचे समजते.

मागील महिन्यात अमृत प्रधानला करोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्याच्या फुफ्फुसांमध्ये न्यूमोनियाची लागण झाली होती. स्थिती गंभीर झाल्याने त्यांना चेन्नईत दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर ग्रीन कॉरिडॉर तयार करत केवळ 11 मिनिटांमध्ये भुवनेश्‍वर एम्समधून बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचवण्यात आले. तिथून त्याला एअर अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे चेन्नईमधील अपोलो रुग्णालयात दाखल केले. दुसरीकडे मध्यमवर्गीय प्रधानची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने उपचारासाठी लागणारी दोन कोटींची रक्कम उभी करण्याचा प्रश्‍न त्याच्या पालकांसमोर राहिला. त्यावेळी त्याच्या मित्रांनी समाज माध्यमाच्या मदतीने क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून 5,831 लोकांकडून आतापर्यंत 65 लाख रुपये जमा केले आहेत. मदतीचा ओघ सुरू असल्याचे प्रधान कुटुंबाकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

शस्त्रक्रिया होणार आहे. मात्र, पूर्णपणे बरे होण्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे रुग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या