Thursday, April 25, 2024
Homeनगरऊस तोडणी कामगारांच्या दोन बैलगाड्यांना ट्रकची धडक

ऊस तोडणी कामगारांच्या दोन बैलगाड्यांना ट्रकची धडक

सोनई |वार्ताहर| Sonai

अहमदनगर-औरंगाबाद राजमार्गावर बर्‍हाणपूर शिवारात पहाटे मालवाहतूक ट्रकने ऊस तोडणी कामगारांच्या दोन बैलगाड्यांना धडक दिल्याने तीन बैल ठार झाले.

- Advertisement -

एक बैल जखमी झाला. तर चौघे ऊस तोडणी कामगार जखमी झाले.

याबाबत माहिती अशी की, मुळा साखर कारखान्याच्या बर्‍हाणपूर शिवारात उसतोडणी साठी दोन बैलगाड्या व कामगार चालले होते. नगरहून औरंगाबादला भरधाव वेगाने चाललेल्या मालवाहतूक ट्रकने (एमएच 16 एवाय 9571) शनिवारी पहाटे साडेचारच्या सुमारास दोन बैलगाड्यास जोराची धडक दिली.

तीन बैल जागीच ठार झाले तर एक बैल किरकोळ जखमी झाला आहे. अपघातात लक्ष्मण उत्तम बर्डे, अकबर अहमद शेख, सुरेश सखाराम घोंगडे, दादासाहेब मारुती पालवे सर्व रा. गोलेगाव ता.शेवगाव हे उसतोडणी कामगार जखमी झाले.

या अपघातात तीन बैल जागीच ठार झाल्याने उसतोडणी कामगारांनी रस्त्यावरच टाहो फोडला. अपघाताची माहिती समजतात मुळा कारखान्याचे सुरक्षाधिकारी प्रविण चौधरी, किरण शेटे व कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोचले.

दोन उसतोडणी कामगारास गंभीर दुखापत झाल्याने त्यांना नगरला हलविण्यात आले तर दोघांवर सोनईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुळा कारखाना सुरक्षा विभागाच्या तत्परतेने दोन गंभीर जखमी उसतोडणी कामगारांना वेळेवर उपचार झाले व आवश्यक मदत वेळेवर मिळाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या