Saturday, April 27, 2024
Homeजळगावआयपीएलवर सट्टा घेणार्‍या दोघांना जळगावातून अटक

आयपीएलवर सट्टा घेणार्‍या दोघांना जळगावातून अटक

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

आयपीएलच्या केकेआर विरुध्द सीएसके या क्रिकेट मॅचवर सट्टा जुगार चालविणार्‍या

- Advertisement -

योगेश महाजन व त्याच्या साथीरादास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिवकॉलनीतील गंगासागर अपार्टमेंटमधून अटक केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार विजयसिंह पाटील यांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार शिवकॉलनी भागात आयपीएलवर सट्टा खेळला जात असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक, उपनिरीक्षक अंगत नेमाने, अशोक महाजन, रमेश जाधव, अनिल जाधव, गोरक्षनाथ बागुल, महेश महाजन, दत्तात्रय बडगुजर, अविनाश देवरे, उमेशगिरी गोसावी, सविता परदेशी यांनी छापा टाकला असता, योगेश प्रदीप महाजन व राजेंद्र श्रीराम पाटील हे सट्टा चालवित असतांना मिळुन आले.

त्यांच्याकडून १ लाख २७ हजार ६०० रुपये किंमतीचा ऐवज, दहा मोबाईल फोन, पेनड्राईव्ह, लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या