Friday, April 26, 2024
HomeUncategorizedजळगाव : मालेगाव बंदोबस्तातील गैरहजर दोन कर्मचारी निलंबित

जळगाव : मालेगाव बंदोबस्तातील गैरहजर दोन कर्मचारी निलंबित

जळगाव – 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मालेगावातील बंदोबस्तावर नियुक्त केले असताना मालेगावात हजर नव्हता गैरहजर राहणार्‍या जिल्हा मुख्यालयातील सोनजी सुभाष कोळी व महेंद्र प्रकाश शिंपी या दोन पोलीस कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. या अगोदर गैरहजरप्रकरणी तीन पोलीस कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे.

- Advertisement -

जळगाव जिल्ह्यातून मालेगाव येथे ११० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी जिल्हा मुख्यालयात नेमणुकीस असलेले सोनजी कोळी व महेंद्र शिंपी हे दोघे नेमून दिलेल्या कर्तव्याच्या ठिकाणी हजर नव्हते. तेे  गैरहजर आढळून आले होते.

त्यामुळे या कर्मचार्‍यांबाबतचा अहवाल जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पाठविण्यात आला होता. पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांना चौकशीच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार त्यांनी चौकशी करुन पोलीस अधीक्षकांकडे अहवाल सादर केला होता. त्या अहवालानुसार डॉ. पंजाबराव उगले यांनी दोघं गैरहजर कर्मचार्‍यांना निलंबित केले आहे.

या अगोदर तीन कर्मचारी निलंबित

मालेगाव बंदोबस्ताच्या ठिकाणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे कॉ. सुरेश रुपा पवार, मुख्यालयातील प्रसाद सुरेश जोशी व परवेझ रईस शेख हे त्यांना नेमून दिलेल्या कर्तव्याच्यो ठिकाणी गैरहजर आढळून आले होते. त्यांनी वरिष्ठांची परवानगी न घेताच जळगावात प्रवेश केला होता.

याबाबत अप्पर पोलीस अधीक्षकांनी चौकशी करुन  पोलीस अधीक्षकांकडे अहवाल सादर केला होता. त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी २५ एप्रिल रोजी सुरेश पवार, प्रसाद जोशी व परवेझ रईस शेख यांना निलंबित केले आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या