Thursday, April 25, 2024
Homeक्रीडा'संजू सॅमसन'वरून शशी थरूर आणि गौतम गंभीर यांच्यात ट्विटर वॉर

‘संजू सॅमसन’वरून शशी थरूर आणि गौतम गंभीर यांच्यात ट्विटर वॉर

मुंबई | Mumbai

IPL च्या तेराव्या हंगामात राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज संजू सॅमसन सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. चेन्नई सुपरकिंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या दोन संघांविरोधात झालेल्या सामन्यात संजू सॅमसनने धडाकेबाज अर्धशतकी खेळी करत राजस्थान रॉयल्सच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. संजू सॅमसनने पंजाबविरुद्धच्या सामन्यात ४२ चेंडूत ८५ धावांची खेळी केली. संजू सॅमसनच्या तुफान फटकेबाजीचे काँग्रेस नेते शशी थरूर यांनी कौतुक केले.

- Advertisement -

शशी थरूर यांनी ट्विट करत म्हंटले की, “राजस्थान रॉयल्सनं अविश्वसनीय विजय मिळवला. संजू सॅमसनला मी दशकापासून ओळखत आहे आणि तो 14 वर्षांचा असताना मी त्याला सांगितले होते की तू पुढचा महेंद्रसिंग धोनी होशील. तो दिवस आज उजाडला आहे. IPL मध्ये सलग दोन सामन्यांत अफलातून खेळ केल्यानंतर वर्ल्ड क्लास खेळाडू दाखल झालाय, हे सर्वांना कळल.”

शशी थरुर यांच्या ट्विटला भारताचा माजी खेळाडू व खासदार गौतम गंभीरने शशी थरूर यांचे ट्विट रीट्विट करत थरूर यांना टोला लगावला आहे. गौतम गंभीर याने म्हंटले आहे की, “संजू सॅमसनला कुणाचा पुढचा होण्याची गरज नाही. तो भारतीय क्रिकेटमधील एकमेव संजू सॅमसन आहे.”

- Advertisment -

ताज्या बातम्या