Thursday, May 9, 2024
Homeमनोरंजनटीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहानला ड्रग तस्करासह अटक

टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहानला ड्रग तस्करासह अटक

मुंबई | Mumbai

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यूप्रकरणी बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनचा (Drugs Connection) तपास एनसीबीकडून (NCB) केला जात आहे. मुंबईत एका अभिनेत्रीला आज रविवारी ड्रग्ज घेताना एनसीबीने रंगेहात पकडलं आहे. प्रीतिका चौहान (Preetika Chauhan) असं या अभिनेत्रीचं नाव असून ती टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये काम करते. वर्सोवामध्ये एका ड्रग्ज पेडलरल फैसल (Faisal) याला भेटायला गेली असता एनसीबीने ही धडक कारवाई केली आहे. अटकेनंतर या दोघांना आज कोर्टात हजर करण्यात आले.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती देताना नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (Narcotics Control Bureau) सांगितले की, विभागाला यासंदर्भात माहिती मिळाली होती. त्यानंतर वर्सोवाच्या माछीमार भागात छापा टाकण्यात आला आणि 99 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान फैजल आणि प्रीतिका यांना 8 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

हिमाचल प्रदेशची रहिवासी असलेली प्रीतिकाने टीव्ही कार्यक्रम ‘संकटमोचन महाबली हनुमान, सावधान इंडिया आणि जग जननी माँ वैष्णोदेवी या कार्यक्रमांमध्ये काम केले आहे. 2015 पासून ती मनोरंजन विश्वात सक्रिय आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात (Sushant Singh Rajput Death Case) समोर आलेल्या ड्रग कनेक्शनचा एनसीबीकडून तपास सुरू आहे. हा तपास सुरू असतानाच एनसीबीसमोर हे नवे प्रकरण समोर आले आहे. SSR मृत्यू प्रकरणातील ड्रग कनेक्शनमध्ये अनेक बड्या कलाकारांची नावं समोर आली होती. अभिनेत्री दीपिका पादूकोण, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग, सारा अली खान या अभिनेत्रींची एनसीबीकडून चौकशी करण्यात आली होती. याप्रकरणी सुशांतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) तब्बल एक महिना जेलमध्ये काढावा लागला होता.

दुसरीकडे सुशांत प्रकरणाची चौकशी करणारी तपास यंत्रणा सीबीआयने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले की त्यांनी या प्रकरणासंदर्भात कोणतीही माहिती माध्यमांना दिली नाही. याप्रकरणी मीडिया ट्रायलसंदर्भात जनहित याचिकांवर सुनावणी करताना कोर्टाने टीका केली की होती की, माध्यमांचे ध्रुवीकरण झाले आहे आणि ते नियंत्रित करण्याचा प्रश्न नसून काम संतुलित करण्याचा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या