Tuesday, April 23, 2024
Homeदेश विदेशमहात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधींकडून कंगनाच्या वक्तव्याचा समाचार, म्हणाले...

महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधींकडून कंगनाच्या वक्तव्याचा समाचार, म्हणाले…

मुंबई l Mumbai

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. देशाच्या स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर कंगनाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर निशाणा साधला. दुसरा गाल पुढे केल्यानं तुम्हाला भीक मिळते स्वातंत्र्य नाही असं वक्तव्य कंगनाने केलं होतं.

- Advertisement -

महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या मंत्रावरून टीका करणाऱ्या अभिनेत्री कंगना रानौतला गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी उत्तर दिलं आहे. या वक्तव्यावर उत्तर देताना तुषार गांधी यांनी म्हटलं की, गांधींचा तिरस्कार करणाऱ्यांपेक्षा दुसरा गाल पुढे करण्यासाठी जास्त धाडसं लागतं.

तसेच मंगळवारी इन्स्टाग्राम स्टोरी टाकत कंगनानं सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंह यांना महात्मा गांधींकडून कोणतंही समर्थन मिळालं नव्हतं, असा दावा केला होता. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कन्या अनिता बोस यांनी कंगनावर पलटवार केला आहे. गांधीजींनी नेताजींसह अनेकांना प्रेरणा मिळाली, असं म्हणत अनिता बोस यांनी कंगनावर निशाणा साधलाय.

अनिता बोस म्हणाल्या की, ‘नेताजी आणि गांधीजींचं नातं फारच गुंतागुंतीचं होतं. कारण गांधीजींना वाटायचं की, ते नेताजींवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. तर दुसरीकडे माझे वडिल गांधीजींचे मोठे चाहते होते. ताजी आणि गांधीजी दोन्ही व्यक्तिमत्त्व महान होती. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. ते एकमेकांना पूरक असून तो एक बंध होता. भारताच्या स्वातंत्र्यासाठी केवळ अहिंसक धोरणच कारणीभूत आहे, असा दावा काँग्रेसच्या काही सदस्यांकडून दीर्घकाळ करण्यात येत होता. पण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, नेताजी आणि इंडियन नॅशनल आर्मी (आयएनए) च्या कारवायांनी देखील भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोठं योगदान दिलं होतं.

- Advertisment -

ताज्या बातम्या