Friday, May 10, 2024
Homeधुळेकोट्यवधींची उलाढाल

कोट्यवधींची उलाढाल

धुळे Dhule। प्रतिनिधी

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या लक्ष्मी पुजनला (Lakshmi Pujan) बाजारपेठेत (market) कोट्यावधींची उलाढाल (Billions of rupees) झाली. कोरोना महामारीतही बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली होती. आग्रारोडवर बॅरेकेटस लावून गर्दीवर नियंत्रण करण्यात आले.

- Advertisement -

हिंदू धर्मातील सर्वात मोठा मानल्या जाणार्‍या दीपोत्सवाला मंगळवारपासून सुरुवात झाली. चार दिवसांच्या कालावधीत नागरिकांनी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केली होती. धनत्रयोदशीमुळे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त साधत ग्राहकांनी सोने खरेदीला पसंती दिली. बाजारपेठेत सोन्या-चांदींच्या वस्तूंना या कालावधीत विशेष मागणी होती.

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या लक्ष्मी पुजनला सोने-चांदी याबरोबरच अनेक चैनीच्या वस्तू खरेदी केल्या. त्यात टीव्ही, एलईडी, फ्रीज यासह अनेक इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू खरेदी केल्या. त्याचबरोबर अनेक वाहनेही या दिवशी खरेदी करण्यात आल्या. त्यात दुचाकी वाहनांसह चार चाकीवाहनेही खरेदी करण्यात आले. मोबाईलची विक्री देखील मोठ्या प्रमाणात झाली. वाढती मागणी लक्षात घेता व्यावसायिकांनी अत्याधुनिक मोबाईल सवलतीच्या विक्रीसाठी दाखल केले होते. ग्राहकांनीही दिवाळीचा मुहूर्त साधत अनेक वस्तू खरेदी करण्यावर भर दिला. त्यात सोने खरेदीत गुंतवणूक त्याचबरोबर प्रॉपर्टी (प्लॉट, शेती) खरेदी केली.

धनत्रयोदशीपासून लक्ष्मी पूजनापर्यंत बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. या कालावधीत शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रारोडवर काही दुकाने आहेत. तर काही व्यावसायीकांनी आग्रारोडवर हंगामी दुकाने थाटली होती. लक्ष्मी पूजन असल्यामुळे आज बाजारपेठेत गर्दी झाली होती.

आग्रारोड बॅरेकेटस् लावून बंद करण्यात आला होता. त्यामुळे वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली होती. लक्ष्मी मूर्ती, पुजेचे साहित्य, वह्या, केरसुनी, नारळ खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती. दसर्‍याला झेंडूची 80 रुपये किलो दराने बाजारपेठेत विक्रीस होती. मात्र दीपोत्सवात झेंडूच्या फुलांचे दर घटले.

- Advertisment -

ताज्या बातम्या