Friday, April 26, 2024
Homeनाशिकबांधकाम क्षेत्रातील उलाढाल ठप्प

बांधकाम क्षेत्रातील उलाढाल ठप्प

सातपूर । प्रतिनिधी

अक्षयतृतीयेचा मुहूर्त गृह खरेदीसाठी मोठा मानला जातो ठिकाणी या मुहूर्तावर गृहप्रवेश केला जातो मात्र करोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक ग्राहकांना गृहखरेदी करता आली नाही त्यामुळे बांधकाम क्षेत्रातील व्यवसायिकांचे कोट्यवधीच्या आर्थिक उलाढाल थंडावली आहे. मागील वर्षीही अक्षय तृतीयेचा मुहूर्त लॉकडाउनमुळेच वाया गेला होता.

- Advertisement -

बांधकाम व्यावसायिकांची कार्यालये दीड महिन्यापासून बंद आहेत. शिवाय, नाशिकमध्ये दोन दिवसांपासून सुरू करण्यात आलेल्या कडक लॉकडाऊनमुळे आता साइटवरील सेल्स ऑफिसही बंद ठेवण्यात आली आहेत. बहुतांशी बांधकाम व्यवसायिकांनी कामगारांची राहण्याची व्यवस्था साइटवरच केल्याने काही प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. परंतु ग्राहकच नसल्याने विक्री ठप्प आहे.

दरवर्षी नाशिकमध्ये अक्षय तृतीयेला मोठ्या प्रमाणात घरे विकली जातात. याशिवाय गाळे प्रकल्प, ऑफिसेस घरे, ऑफिसेस, प्लॉटची अशा व्यावसायिक प्रकल्पांचीही चांगली विक्री होत असते. जिल्ह्यात प्लॉट विक्रीचेही मोठे मार्केट होते मात्र करोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व उलाढाल ठप्प झाली आहे. परिणामी, यंदा रियल इस्टेट क्षेत्रातील सुमारे शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्तीची उलाढाल थंडावली आहे. सलग दुसर्‍या वर्षी लॉकडाउनमुळे गुढीपाडवाा व अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकल्यामुळे व्यवसायिकांना जुलैपासून सुरू होणार्‍या सीझनकडे लक्ष लागलेले आहेे

- Advertisment -

ताज्या बातम्या