Friday, April 26, 2024
Homeनगरकरोना टेस्ट, लसीकरणासाठी टाळाटाळ करणार्‍यांना शासकीय योजनांचे लाभ बंद करा

करोना टेस्ट, लसीकरणासाठी टाळाटाळ करणार्‍यांना शासकीय योजनांचे लाभ बंद करा

कोपरगाव (प्रतिनिधी) – शासकिय योजनांचा लाभ घेण्यासाठी रांगा लावणारे, लाभ घेणारे काही लोक टेस्टिंग व लसीकरण करून घ्यायची टाळाटाळ करत आहे. शासनाने कठोर भूमिका घेऊन देशातल्या प्रत्येक नागरिकाला यासाठी सक्ती केली पाहिजे. टेस्टिंग व लसीकरण करणार्‍यांनाच शासकीय योजनांचे लाभ दिले पाहिजेत. जे लोक शासकीय आदेश पाळणार नाहीत त्यांचे पिवळे रेशनकार्ड, गॅस सबसिडी, पंतप्रधान आवास योजना, शासकीय अनुदाने, वेतन, आर्थिक लाभ बंद केले पाहिजेत अशी मागणी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

नगराध्यक्ष वहाडणे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, संपुर्ण देशभर करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार, प्रशासन, सर्वसामान्य जनता प्रयत्न करत आहे. प्रशासकीय यंत्रणा जीव धोक्यात घालून दिड वर्षांपासून करोना योद्धे बनूनच काम करत आहेत. याच प्रयत्नांत अनेकांचा बळीही गेलेला आहे. संपुर्ण देश करोनामुळे हैराण झालेला असतांना काहीजण जाणीवपूर्वक कोरोना टेस्टिंग व लसीकरण मोहिम हाणून पाडण्याच्या प्रयत्नांत आहेत. आरोग्य विभाग व कोपरगाव नगरपरिषदही स्वखर्चातून प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांचे टेस्टिंग करण्याची मोहिम राबवत आहे. मोफत टेस्टिंग असूनही नागरिक मनापासून प्रतिसाद देत नाहीत असाच अनुभव येत आहे.

- Advertisement -

अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी प्रयत्न करत आहेत. पण असे अनुभवाला येत आहे कि काही ठराविक लोक हेतुपुरस्सर टेस्टिंगसाठी यायला तयार नाहीत. इतरवेळी मास्क वापरायचे नाहीत, करोना विरूद्धच्या मोहिमेला प्रतिसाद द्यायचा नाही अशा प्रवृत्तीच्या लोकांचे लाड बंद करा. देशातील एक मोठा वर्ग असे नियमबाह्य व धोकादायक वर्तन करत असेल तर करोनाचा प्रादुर्भाव कसा कमी होईल? राजकारण्यांनी सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना टेस्टिंग-लसीकरण सक्तीचे केले पाहिजे. मतांचा विचार न करता कायदे राबवा असेही नगराध्यक्ष वहाडणे यांनी निवेदनात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या