Friday, April 26, 2024
Homeनगरबाजार समिती आवारात तूर खरेदी केंद्र सुरु

बाजार समिती आवारात तूर खरेदी केंद्र सुरु

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) –

श्रीगोंदा तालुक्यात तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले असून खुल्या बाजाररापेक्षा हमी भाव केंद्रावर एक हजार रुपये अधिक बाजार तुरीला

- Advertisement -

मिळणार असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तूर हमी भाव केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. तुर विक्रीसाठी शेतकर्‍यांनी नोंदणी करावी, असे आवाहन आरोही सहकारी संस्थेचे वतीने करण्यात आले आहे.

श्रीगोंद्यात मागणीनुसार तूर खरेदी केंद्र व नाव नोंदणी सुरु करण्यात किमान आधारभूत शेतमाल खरेदी योजने अंतर्गत सन 2020-21 उत्पादित झालेल्या तुरीच्या आधारभूत हमीभाव किमतीने खरेदी केंद्रासाठी महाराष्ट्र स्टेट को.ऑप मार्केटिंग फेडरेशन लि. व जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या आदेशावरून श्रीगोंदा कृषि उत्पन्न बाजार समिती येथे आरोही बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित पिसोरेखांड या संस्थेस मान्यता मिळाल्याचे माहिती मार्केट कमिटीचे सभापती यांनी दिली. हमीभाव तूर 6 हजार प्रतिक्विटल निश्चित करण्यात आला आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील तूर उत्पादकानी या खरेदी केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. आधारभूत तूर खरेदी केंद्रासाठी उत्पादकांनी नाव नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, मोबाईल नंबर व 7/12, 8 अ (2020-21 ची खरीप पिक तूर नोंदणी) करून संस्थेच्या लिंबू मार्केट येथील तूर व हरभरा खरेदी केंद्रावर जमा करण्यात यावे नोंदणी केलेल्या मोबाईल नंबरवर खरेदीसाठी शेतकर्‍याना नोंदणी कृत मोबाईलवर देण्यात येईल सर्व खरेदी प्रकिया ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवारात हे केंद्राची सुरुवात करण्यात आली. यावेळी बाजार समिती सचिव यांच्यासह संचालक आणि आरोही कृषी संस्थेचे संचालक गणेश गावडे उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या