Thursday, April 25, 2024
Homeजळगावसर्वपक्षीय गटनेत्यांच्या गटाला सुरुंग

सर्वपक्षीय गटनेत्यांच्या गटाला सुरुंग

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्ह्यातील जि.प.च्या 77 गट (77 groups of Z.P.) आणि 154 गणांसाठी (154 counts) लोकसंख्येच्या चक्राकारपद्धतीने गुरुवारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडतीचा (Reservation draw) कार्यक्रम जाहीर (Announced) करण्यात आला. त्यात भाजप जिल्हा परिषदेचे गटनेते पोपटतात्या भोळे, शिवसेनेचे गटनेते रावसाहेब पाटील, काँग्रेसचे गटनेते प्रभाकर सोनवणे, राष्ट्रवादी काँगे्रसचे गटनेते शशिकांत साळुंखे यांच्या जिल्हा परिषदेच्या गटात आरक्षण निघाल्याने त्यांना या आरक्षणाचा फटकाmpact of reservation) बसला आहे. भाजप-शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे या सर्वपक्षीय गटनेत्यांना दुसर्‍या गटात उमेदवारी शोधावी लागेल;अन्यथा त्यांना पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. आरक्षण सोडतीनंतर जिल्हा परिषदेच्या विविध गटांच्या बदलत्या समीकरणाला स्वीकारुन काहींनी पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्याचा निर्धार केला आहे.

- Advertisement -

सन 2017 मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत 67 गट होते. आता नव्याने लेकसंख्या व चक्राकारपद्धतीने झालेल्या प्रभाग गटरचनेनुसार 77 गट झाले असून या गटांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्याने जिल्ह्यातील गटनिहाय चित्र स्पष्ट झाले आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत जिल्हा परिषदेत भाजप-शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँगे्रस या सर्वपक्षीय गटनेत्यांनी नेतृत्व केले.

मात्र, आरक्षण सोडतीने त्यांच्या गटातील आरक्षणामुळे सर्वपक्षीय गटनेत्यांची दांडी गूल झाली आहे. त्यामुळे 2022 च्या निवडणुकीत त्यांना नवीन मतदार संघातील गटात उमेदवारी करावी लागेल. नाहीतर पक्षाने दिलेल्या उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. गटनेत्यांना त्यांच्या गटाचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी त्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

दिग्गजांना धक्का

निंभोरा बुद्रुक-तांदलवाडी गटातून निवडुन आलेले नंदकिशोर महाजन यांचा गट सर्वसाधारण आरक्षित झाला आहे. पाळधी बुद्रुक-बांभोरी प्र.चा. नामाप्र प्रवर्गातून निवडुन आलेले प्रतापराव गुलाबराव पाटील यांचा गटदेखील सर्वसाधारण आरक्षित झाला आहे. त्यामुळे यांना उमदेवारीसाठी दुसरा गट शोधावा लागणार आहे.

गट शोधावा लागणार

कळमसरे-जळोद गटातील जयश्री अनिल पाटील यांचा गट देखील सर्वसाधारण आरक्षित झाला आहे. त्यामुळे त्यांनाही या आरक्षणाचा फटका बसला आहे. मंगरुळ-शिरसमणी गटाचे डॉ.हर्षल माने यांचा गटदेखील सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने त्यांनाही सुरक्षित गट शोधावा लागणार आहे.

वर्चस्व कायम ठेवणार वाघळी-पातोंडा गटातून नामाप्र वर्गातून मी या गटाचे पाच वर्षांपासून प्रतिनिधीत्व करीत आहे. आता, वाघळी गटातून एसटी महिला राखीव प्रवर्गाचे आरक्षण हेे निवडणुक आयोगाच्या नियमानुसार जिल्ह्यातील सर्व गटात सोडत निघाली आहे. हा गट महिला राखीवसाठी आरक्षीत झाल्याने पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडुन आणण्यासाठी सर्वस्वी प्रयत्न करणार आहे.

-पोपट भोळे, भाजपा जि.प.गटनेते

शिवसेनेचा भगवा फडकवू विखरण-रिंगणगाव गटाच्या सर्वसाधारण प्रवर्गातून निवडुन आलो होतो. आताही ओबीसी नामाप्र आरक्षित झाल्याने रिंगणगाव गटातून पुन्हा उमेदवारी करण्याची संधी मिळणार आहे. शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, डॉ.हर्षल माने यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवून शिवसेनेचा भगवा जि.प.वर फडकविण्याचा मानस आहे.

-नानाभाऊ महाजन, उप. जि.प.गटनेते

काँग्रेसच्या जागा निवडुन आणू न्हावी प्र.या.-बामणोद गटातून अनुसूचित जमाती प्रवर्गातून मी गेल्या पंचवार्षिक पासून प्रतिनिधीत्व करीत आहे. या गटात ओबीसी (नामाप्र) आरक्षण जाहीर झाले आहे. काँग्रेस पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडुन आणण्यासाठी प्रयत्नशिल राहील. या आरक्षणामुळे ओबीसी समाजाला न्याय मिळाला आहे. जास्तीत जास्त काँग्रेसच्या जागा निवडुन आणू.

-प्रभाकर सोनवणे, काँग्रेस जि.प.गटनेते

रा.काँ.चे प्राबल्य कायम ठेवू बहाळ-कळमडू गटातून सर्वसाधारण प्रवर्गातून मी, गेल्या पाच वर्षापुर्वी निवडुन आलो होतो. या गटात एसटी महिला राखीव आरक्षीत झाल्याने एसटी प्रवर्गाला न्याय मिळाला आहे. गेल्या वीस वर्षांपासून या गटात नेतृत्व करीत आहे. यापुर्वी कोणत्याही प्रवर्गातील रा.काँ.ने दिलेल्या उमेदवाराला निवडणुन आणले आहे. ही परंपरा कायम ठेवण्यासाठी कटीबध्द आहे.

-शशिकांत साळुंखे, रा.काँ. जि.प.गटनेते

- Advertisment -

ताज्या बातम्या