Thursday, April 25, 2024
Homeनाशिकतुळजापूर-सप्तशृंगीगड बससेवा सुरू

तुळजापूर-सप्तशृंगीगड बससेवा सुरू

सप्तशृंगीगड। वार्ताहर | Saptashringi Gad

आदिमाया आई सप्तशृंगी गडावर (Saptashringigad) येणार्‍या आई तुळजाभवानीच्या (Tulja Bhavani) पुण्यपावन नगरीतून येणारी बस सेवा (Bus service) भाविक भक्तांना सुलभ दर्शन मिळावा याकरिता बस सुरू करण्यात आली.

- Advertisement -

काल सकाळी 8 वाजता बस श्री सप्तशृंगी गडावर येताच सप्तशृंगी ग्रामस्थांनी बस चालक व वाहक यांचे शाल व श्रीफळ तसेच आई सप्तशृंगी देवीची प्रतिमा देऊन ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सप्तशृंगगडावर आई तुळजापूरच्या पुण्यपावन नगरीतून थेट अर्धेशक्तीपीठ येथील आई सप्तशृंगी मातेच्या पुण्यगरीत सप्तशृंगीगड ग्रामपंचायतीच्या (Saptashringigad Gram Panchayat) निवेदनाद्वारे (memorandum) बस सेवा सुरू करण्यात आली आहे.

भाविक भक्तांना तुळजापूर जाण्यासाठी किंवा तुळजापूर येथून सप्तशृंगी गडावर येण्यासाठी तुळजापूर (Tuljapur) ग्रामस्थांच्या माध्यमातून ही बस सेवा (Bus service) सुरू करून भाविक भक्तांना व ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. सप्तशृंगी गडावर दर्शनाला येणार्‍या भाविकांना तुळजापूर येथून सायंकाळी 8 वाजता बस मार्गस्थ होईल. त्यांनतर सकाळी 8 वाजता श्री सप्तशृंगी गडावर पोहचेल.

तसेच तीच बस दिवसभर सप्तशृंगी गडावर थांबा घेऊन रात्री 8.15 वाजता सप्तशृंगीगड ते तुळजापूर रवाना होईल. याकरिता भाविक भक्तांना बसच्या माध्यमातून सुलभ प्रवास करता येणार आहे. यावेळी राजेश गवळी, शांताराम गवळी, श्रावण आहिरे, हेमंत कानडे, मोतीराम चव्हाण, प्रकाश पाटील, विलास सदगीर आदी उपस्थित होते.

येण्याचे वेळापत्रक

तुळजापूर येथून सकाळी 8 वाजता बस मार्गस्थ होईल.

उस्मानाबाद : 8.25 मि.,

भूम : 10 वाजता,

पाथरूड : 10.20

मि., जामखेड : 11.30 मि.,

आष्टी 12 वाजता,

अहमदनगर :1 .45 मि.

शिर्डी : 3.30 मि.

सिन्नर : 5.30 मि,

नाशिक : 6.15 मि. सकाळी 8 वाजता श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर पोहचेल.

जाण्याचे वेळापत्रक

श्री सप्तशृंगीगड येथून रात्री 8.15 वा बस निघेल.

नाशिक : 10 वाजता

सिन्नर : 10.45 मि.,

शिर्डी : 12.45 मि.,

अहमदनगर : 2.30 मि.,

आष्टी 4.15 मि.,

जामखेड : 4.45 मि. ,

पाथरुळ : 5.30मि.,

भूम : 6.15 मि.,

उस्मानाबाद 7.50 मि.,

तुळजापूर सकाळी 8.15 मि., पोहचेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या