Friday, April 26, 2024
Homeनगरतुळापूरला दोन गटांत शेतीच्या वादावरून हाणामारी

तुळापूरला दोन गटांत शेतीच्या वादावरून हाणामारी

राहुरी |प्रतिनिधी|Rahuri

राहुरी तालुक्यातील तुळापूर येथे शेतीच्या वादावरून दोन गटात लाथाबुक्क्यांनी हाणामारी झाल्याची घटना बुधवार दि. 17 फेब्रुवारी रोजी घडली.

- Advertisement -

याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांतील एकूण 12 जणांवर परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अनिता अजित सिनारे (वय 27 वर्षे, रा. तुळापूर) यांनी राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दि. 17 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजे दरम्यान फिर्यादी हे त्यांच्या शेतात जेसीबी मशीनने जमीन लेवल करत असताना यातील आरोपी हे बेबी साबळे यांना म्हणाले, पांडुरंग देवराम हारदे यांच्याकडून आम्हाला या जमिनीचे पैसे घ्यावयाचे आहेत.

या जमिनीबाबत न्यायालयात दावा दाखल करणार आहे. तोपर्यंत तुम्ही शेतात पाऊल ठेवायचे नाही. असे म्हणून आरोपी यांनी बेबी साबळे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण व काठीने मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.

अनिता सिनारे यांनी राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून बेबी सुभाष साबळे, राहुल सुभाष साबळे, सचिन सुभाष साबळे, सुभाष साबळे (सर्व रा. तुळापूर ता. राहुरी) या चारजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास हवालदार एस. डी. राठोड हे करीत आहेत.

तसेच बेबी सुभाष साबळे (वय 45 वर्षे, रा. तुळापूर ता. राहुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दि. 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजे दरम्यान यातील आरोपींनी गैरकायद्याची मंडळी एकत्रित जमवून अजित सिनारे याने सोमनाथ सिनारे यांचे जेसीबी मशीन घेऊन आले. त्यावेळी त्यांना बेबी साबळे म्हणाल्या, या जमिनीचा न्यायालयात वाद चालू आहे. दाव्याचा निकाल होईपर्यंत जमिनीत काही करू नका. असे म्हणाल्याचा आरोपींना राग आल्याने त्यांनी बेबी साबळे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जेसीबीखाली घालून मारण्याची धमकी दिली.

बेबी साबळे यांच्या फिर्यादीवरून अजित सोपान सिनारे, अनिता अजित सिनारे, विमल सोपान सिनारे, कैलास रावसाहेब हारदे, रावसाहेब देवराम हारदे (सर्व रा. तुळापूर ता. राहुरी), पांडुरंग देवराम हारदे, संजय पांडुरंग हारदे (दोघे रा. वासीम टोका ता. नेवासा), सोमनाथ शिवाजी सिनारे (रा. निंभेरे ता. राहुरी) या आठजणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एस. जी. टेमकर हे करीत आहेत. परस्पर विरोधात दाखल झालेल्या या फिर्यादीवरून एकूण 12 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या