Friday, April 26, 2024
Homeनंदुरबारनंदुरबार येथे चित्ररथाचा शुभारंभ

नंदुरबार येथे चित्ररथाचा शुभारंभ

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

क्षयरोग आणि कुष्ठरोग निर्मुलन अभियानाबाबत जिल्ह्यातील नागरिकांना माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाला जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी हिरवी झेंडी दाखवून जनजागृती मोहिमेचा शुभारंभ केला.

- Advertisement -

यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, डॉ.राजेश वळवी, सहायक संचालक डॉ. अभिजीत गोल्हार, जिल्हा कार्यक्रम समन्वयक शिरीष भोजगुडे आदी उपस्थित होते.

अधिक क्षयरोग रुग्ण आढळणार्‍या भागात जनजागृतीवर भर देण्यात यावा आणि रुग्णांना वेळेवर उपचाराबाबत माहिती देण्यात यावी असे यावेळी डॉ.भारुड यांनी सांगितले.

राष्ट्रीय क्षयरोग व कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत संयुक्त कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध अभियान दि.1 ते 16 डिसेंबर, 2020 या कालावधीत राबविण्यात येत आहे.

या अभियानाबाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या जनजागृती रथाद्वारे शहरी तसेच ग्रामीण भागातील अधिक क्षयरोग रुग्ण आढळणार्‍या भागात तसेच वाडे, वस्त्या, डोंगरभाग, विटभट्या, ऊसतोड मजुर या भागात क्षयरोग व कुष्ठरोगाविषयी मराठी व आदिवासी बोलीभाषेतून ध्वनिक्षेपक आणि फलकाद्वारे क्षयरोगा व कुष्ठरोगाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या