Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यासप्तशृंगीगड : आम्ही तर आदिमायेचे उपासक; आम्हालाही हवे 'विश्वस्त'पद

सप्तशृंगीगड : आम्ही तर आदिमायेचे उपासक; आम्हालाही हवे ‘विश्वस्त’पद

सप्तशृंगीगड | वार्ताहर

श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या विश्वस्त मंडळात १ ऑक्टोबर २०२० ते ३० सप्टेबर २०२५ या पाच वर्षांसाठी नुकतीच पाच विश्वस्तांची निवड करण्यात आली. मात्र, या विश्वस्त मंडळात स्थानिकांना प्रतिनिधीत्व न मिळाल्याने सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर तोडगा म्हणून संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधिश गणेश देशमुख यांनी ग्रामस्थांशी चर्चा करुन संस्थानच्या घटनेतील ३८ कलमान्वये उपसमिती करुन त्यात स्थानिकांना सदस्यत्व देण्याबाबत कार्यवाही करुन दोन सदस्यांची निवड करण्यात आली…

- Advertisement -

या निवडीनंतर स्थानिकांच्या नाराजी नाट्यावर पडदा पडत नाही तोच सुमारे पाचशे वर्षांपासून गडाच्या मंदीर शिखरावर वर्षभरातून दोनदा कीर्तिध्वज फडकवणारे दरेगांवचे गवळी पाटील कुटुंबिय यांनाही विश्वस्तपदाचा मान मिळाला पाहिजे होता असा सूर उमटताना दिसून येतो.

दुसरीकडे तृतीय पंथीय समुहाचेही सप्तशृंगी गड हे श्रद्दा, भक्ति व शक्तिचे स्थान म्हणून ओळख सर्वदूर झाली आहे. तृतीय पंथीय समुदाय स्थानिक रहिवाशी नसला तरी आदिमायेच्या दरबारी त्यांचा प्रतिनिधी म्हणून संस्थानच्या विश्वस्त संस्थेमध्ये स्थान मिळण्याची मागणी आखिल भारतीय किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पायल नंदगिरी यांनी केली आहे.

श्री सप्तशृंगी निवासिनी मातेचे देशभरातून भक्त परिवार आहे. तृतीयपंथी म्हटले की, त्यांचे आराध्य दैवत म्हणजे श्री सप्तशृंगी माता.महाराष्ट्रात एकही असा तृतीयपंथी नाही की तो आई सप्तशृंगीच्या चरणी लिन होत नाही.

परंपरेनुसार कोजागिरी उत्सव असो की, नवरात्र उत्सव.लाखोंच्या संख्येने तृतीयपंथी देवीच्या चरणी नमस्तक होत असतात.आज समाजात तृतीयपंथी यांना हक्काने जगता यावे.सर्वसामान्य प्रमाणे त्यांना वागणूक मिळावी.

तृतीयपंथातील व्यक्तीला आपल्या व्यवस्थपणामध्ये समाविष्ट केल्यास निश्चित यापुढील काळात एक चांगल्या प्रकारचे व्यवस्थापन तृतीयपंथी समूहाचे करता येईल. सर्व सामान्यप्रमाणे आम्हाला आमचा अधिकार मिळवा यासाठी सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे अध्यक्ष गणेश देशमुख यांच्याकडे पायल नंदगिरी महामंडलेश्वर किन्नर आखाडा यांनी निवेदन देत मागणी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या