Saturday, April 27, 2024
Homeनगरट्रक कापडबाजारात घुसल्याने वाहतुक कोंडी

ट्रक कापडबाजारात घुसल्याने वाहतुक कोंडी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहरात वाहतुकीचा बोजवारा उडालेला असून काल रविवारी सकाळी त्याचा अनुभव नगरकरांनी पुन्हा घेतला. पुण्याकडून आलेला एक ट्रक रस्ता चुकल्याने नगरमध्ये घुसला. त्यात वाहतुक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे तो ट्रक थेट कापडबाजारात गेला.

- Advertisement -

राहाता बाजार समितीतील वाचा कांद्याचा भाव

दरम्यान ट्रक कापडबाजारात गेल्यानंतर तेथून बाहेर निघण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागला. तोपर्यंत वाहतुकीची कोंडी झाली होती. नेहमीप्रमाणे वाहतुक पोलीस तेथे उपलब्ध नसल्याने नगरकरांचे चांगलेच हाल झाले. अवजड वाहनांना नगर शहरात वाहतुकीस बंदी आहे. तरीही वाहतुक शाखा पोलिसांच्या आशिर्वादाने नगर शहरातून सर्रास अवजड वाहतुक होते. यामुळे अपघात होतात. वाहतुकीची कोंडी होते. वाहतुक पोलिसांकडून जाणीवपूर्वक वाहतुकीचे नियोजन केले जात नसल्याचे दिसून येत आहे.

विखे पाटील नगर-सोलापूरचे पालकमंत्रीविद्यार्थीनीने रोडरोमिओेंना चपलेने चोपले

- Advertisment -

ताज्या बातम्या