Friday, May 10, 2024
Homeनाशिकशंभर फुट खोल दरीत ट्रक कोसळला, एक ठार

शंभर फुट खोल दरीत ट्रक कोसळला, एक ठार

इगतपुरी । Igatpuri

मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra Highway) नवीन कसारा घाटात (Kasara Ghat) भीषण अपघात झाला असून नाशिकहुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या माल वाहतूक ट्रकचा (Truck) ब्रेक फेल झाल्याने सदर ट्रक पहाटे चार वाजेच्या सुमारास १०० फूट खोल दरीत कोसळला.

- Advertisement -

या अपघातात एक जागीच ठार झाला तर तीन जण गंभीर जखगी झाले आहेत. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन टीमच्या तरुणांनी मयत व जखमींना दरीच्या बाहेर काढुन रुग्णालयात पाठवले.

याबाबत अधिक माहिती अशी की, (दि. ०६) रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावरील नवीन कसारा घाटात नाशिकहुन (Nashik) मुंबईच्या दिशेने बॉटल घेऊन जाणारा मालवाहु ट्रकचे (एम. एच. १२ एच. डी. ८३५५ ) घाटात ब्रेक फेल झाल्याने ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक थेट १०० फुट दरीत कोसळला.

या अपघाताची माहिती आपत्ती व्यवस्थापन टीमचे प्रमुख शाम धुमाळ यांना समजताच त्यांनी आपल्या टीमच्या सहकार्यांना घेऊन घटनास्थळी आंधारात १०० फुट खोल दरीत उतरून मदतकार्य सुरु केले. भरपावसात पहाटे ४ ते सकाळी ७ वाजे पर्यंतच्या अथक प्रयत्नाने गंभीर असलेल्या ३ जखमींना सुखरूप बाहेर काढले. वाहन चालक गोकुळ शिवाजी बोडके (३१ वर्ष) रा. नाशिकरोड याचा जागीच मृत्यू झाल्याने सदर मृतदेह कसारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला.

यावेळी आपत्ती व्यवस्थापन टीमचे प्रमुख शाम धुमाळ, मनोज मोरे, दत्ता वाताडे, अक्षय राठोड, विनोद आयरे, लक्ष्मण वाघ, देवा वाघ, जस्सी, बाळू मांगे यांच्यासह टोलप्लाझाचे कर्मचारी व महामार्ग सुरक्षा पोलीस पथक यांनी ३ तास अथक प्रयत्न चालू होते.

अपघातात जखमी झालेले अमित चंद्रकांत कुलकर्णी, योगेश संजय पाडळे, वय ३५ व शिवा (पुर्ण नाव माहित नाही ) सर्व राहणार नाशिकरोड येथील असुन या ३ गंभीर जखमींना वाचविण्यात आपत्ती व्यवस्थापन टीमला यश आले असुन त्यांना उपचारासाठी इगतपुरी ग्रामीण रूग्णालयात पाठवण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या