Friday, April 26, 2024
Homeनाशिकसिमेंट पोलचा ट्रक मोहदरी घाटात कोसळला

सिमेंट पोलचा ट्रक मोहदरी घाटात कोसळला

सिन्नर | प्रतिनिधी

सिन्नरहून मालेगावकडे सिमेंटचे पोल घेऊन जाणारा ट्रक मोहदरी घाटाच्या वळणावर अनियंत्रित होऊन डाव्याबाजूला दरीत कोसळल्याने चालक आणि क्लिनर किरकोळ जखमी झाले. या अपघातात ट्रकचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना बुधवारी (दि.३) दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.

- Advertisement -

सिन्नर – नाशिक मार्गावर मोहदरी घाटाच्या शेवटच्या वळणावर हा अपघात झाला. तालुक्यातील गोंदे येथे सिमेंट पोल भरून मालेगावकडे घेऊन जाणारा ट्रक (एमएच-४१,एयु-९२००) हा चालक मोहम्मद हुसेन शेख घेऊन जात होता. यावेळी मोहदरी घाटातून नासिककडे जात असताना घाटातील शेवटच्या वळणावर अनियंत्रित झालेल्या ट्रकवर नियंत्रण मिळवण्यास चालकास अपयश आले. त्याने ट्रक घाटातील संरक्षक भिंतीच्या कठड्यावर आदळून वेगावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला. ट्रक कठड्यावर आदळून तेथून थेट खाली १५ ते २० फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात ट्रकचा चक्काचूर होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातात चालक मोहम्मद हुसेन शेख आणि क्लीनर महंमद समीर शेख रा. मालेगाव, हे दोघे किरकोळ जखमी झाले. शहरातील खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर ते मालेगावी रवाना झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या